Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कात्रज मंडई चौकामध्ये ड्युटीवर असतानाच चक्कर आली अन् खाली कोसळले, पुण्यात 42 वर्षीय वाहतूक पोलिसांचा दुर्दैवी मृत्यू..!!

  कात्रज मंडई चौकामध्ये ड्युटीवर असतानाच चक्कर आली अन् खाली कोसळले, पुण्यात 42 वर्षीय वाहतूक पोलिसांचा दुर्दैवी मृत्यू..!!   सौ. स्नेहल तांब...

 कात्रज मंडई चौकामध्ये ड्युटीवर असतानाच चक्कर आली अन् खाली कोसळले, पुण्यात 42 वर्षीय वाहतूक पोलिसांचा दुर्दैवी मृत्यू..!! 



 सौ. स्नेहल तांबोळी (पुणे शहर) प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

पुणे शहर वाहतूक शाखेतील पोलीस नाईक धनाजी भरत वनवे (वय 42) यांचे काल बुधवारी सायंकाळी कर्तव्यावर असताना हृदयविकारांच्या तीव्र झटक्यांने निधन झाले ही दुर्दैवी घटना कात्रज मंडई चौकात सायंकाळच्या सुमारांस घडली त्यांच्या निधनामुळे पुणे शहर पोलीस दलात शोककळा पसरली आहे. पोलीस नाईक वनवे हे नेहमीप्रमाणे वाहतूक नियमांसाठी कात्रज मंडई चौकात तैनात होते. अचानक त्यांना चक्कर आली आणि ते कोसळले, तात्काळ उपस्थित सहकाऱ्यांनी त्यांना कात्रज येथील साईस्नेह रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू करण्यापूर्वीच मृत घोषित केले डॉक्टरांच्या प्राथमिक अहवालानुसार हृदयविकारांच्या तीव्र धक्क्याने वणवे यांचे निधन झाले आहे. ( एक कर्तव्यदक्ष आणि समर्पित अधिकारी ) धनाजी वनवे हे गेली अनेक वर्ष पुणे शहर वाहतूक शाखेत कार्यरत होते. त्यांनी पोलीस दलात अत्यंत जबाबदारीने प्रामाणिकपणे आणि शिस्तप्रियतेने आपले कर्तव्य बजावले आहे. ट्राफिक नियंत्रणासारख्या कठीण कामात देखील त्यांचा नेहमीच सकारात्मक आणि शांत दृष्टीकोन असायचा त्यामुळे सहकारी पोलिसांमध्ये ते चांगलेच लोकप्रिय झाले होते. आपले काम नेहमीच अत्यंत जबाबदारीने पार पाडायचे शिस्तप्रिय आणि मनमिळावू अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या अचानक निधनाने संपूर्ण वाहतूक पोलीस विभाग सुन्न झाला आहे. वनवे यांच्या पश्चांत आई वडील पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुणे शहर पोलीस दलाने कुटुंबाला आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल अशी माहिती वरिष्ठांनी दिली आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्यासह वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि अनेक सहकाऱ्यांनी वनवे यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले त्यांना पोलीस दलातर्फे जड अंतकरणांने आदरांजली अर्पण करण्यात आली आहे.

No comments