adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

साकळी येथे लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

 साकळी येथे लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन  भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मनवेल ता यावलः साकळी य...

 साकळी येथे लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन 



भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मनवेल ता यावलः साकळी येथील शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्तने अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  विद्यालयाचे प्राचार्य  आर. जे. महाजन हे होते तर व्यासपीठावर  पर्यवेक्षक एस. जे पवार, बी ई महाजन, एस पी निळे हे उपस्थित  होते. यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे   पूजन व माल्यार्पण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला. ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. यात लहान गटात तनुष्का गणेश चौधरी ५ वी प्रथम, दुर्वा चंद्रशेखर चौधरी ८ वी द्वितीय, आकांक्षा कैलास ठाकूर५ वी तृतीय

तर मोठ्या गटात उर्मिला प्रमोद बडगुजर १० वी प्रथम,मोनाली किरण माळी ९ वी द्वितीय, अक्षरा रमेश बडगुजर ९ वी,योगेश  संजय बोरसे ९ वी तृतीय क्रमांक मिळविला या स्पर्धेचे परीक्षक म्हणून कामकाज, पी एम. पाटील,एस. एस. तडवी,वाय बी सपकाळे,  एस. बी सोनवणे यांनी कामकाज पहिले

 यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष  आर. जे. महाजन यांनी  लोकमान्य टिळक  यांच्या जीवनाविषयी   जहाल मतवादी गटाचे  नेते, गीतारहस्य, समाजसुधारक, पत्रकार, याविषयी  माहिती  देऊन मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  एन पी पाटील यांनी केले व आभार वाय बी सपकाळे   यांनी मानलेत.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

No comments