विरावली येथे कृषिकन्यांनी साजरी केली लोकमान्य टिळक जयंती व वनसंवर्धन दिवस भरत कोळी यावल ता.प्र. (संपादक -:- हेमकांत गायकवाड) विरावली (ता....
विरावली येथे कृषिकन्यांनी साजरी केली लोकमान्य टिळक जयंती व वनसंवर्धन दिवस
भरत कोळी यावल ता.प्र.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
विरावली (ता. यावल) – विरावली गावातील मराठी शाळेत २३ जुलै रोजी लोकमान्य टिळक यांची जयंती आणि वनसंवर्धन दिवस कृषिकन्यांच्या पुढाकाराने अत्यंत प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पांजली अर्पण आणि दीपप्रज्वलनाने झाली. कृषिकन्यांनी टिळक यांच्या जीवनकार्यावर भाषणे सादर केली. विशेषतः "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" या टिळकांच्या घोषवाक्याचे महत्त्व विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे मांडले. विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीत आणि भाषण करताना टिळकांच्या कार्याचा इतिहास उलगडून दाखवला. कार्यक्रमात दुसरा महत्त्वाचा भाग होता वनसंवर्धन दिवस . कृषिकन्यांनी ‘वृक्ष वाचवा, जीवन वाचवा’ हा संदेश देत शाळेच्या आवारात आणि गावातील काही निवडक जागांवर वृक्षारोपण केले. प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड लावण्याचा आणि त्याची जबाबदारी घेण्याचा संकल्प केला. झाडांचे महत्व, हवामान बदलाचे दुष्परिणाम, आणि पर्यावरण संरक्षणावर मुलांनी भाषणातून, घोषवाक्यांतून आणि पोस्टरद्वारे जनजागृती केली. या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापिका श्री. योगेश्वरी धनगर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, "टिळकांचे विचार आणि पर्यावरण संवर्धन हे दोन्ही देशाच्या भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. विद्यार्थ्यांनी आजच्या काळात हे दोन्ही मूल्य आत्मसात करणे आवश्यक आहे."
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले. अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान, पर्यावरणाप्रती जबाबदारी आणि देशप्रेमाची भावना निर्माण होते, असे उपस्थितांचे मत होते.
घोषवाक्ये
“वृक्ष लावा, पृथ्वी वाचवा!”
“टिळकांचे विचार – आमचा आधार!”
“स्वराज्य वाचवा, पर्यावरण जपा!”
“एक विद्यार्थी – एक झाड!”
कार्यक्रमाचे संयोजक कृषिकन्या धनश्वेता अहिरे, प्रज्ञा गजरे, ऐश्वर्या सोनवणे, सृष्टी डोंगरे, प्रतीक्षा गावित, विशाखा सोनावणे, यांनी केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका योगेश्वरी धनगर, शिक्षकवृंद प्रियंका तायडे, सुवर्णा पाटील, सोबतच अंगणवाडी शिक्षिका कविता पाटील,भावना पाटील तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कृषिकन्यांना कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ. शैलेश तायडे सर, कार्यक्रम समनव्यक प्रा. बी. एम. गोणशेटवाड सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. म.पी भोळे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
No comments