adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मोबाईला चा उपयोग चांगल्या कामासाठी करा पोलिसांकडून विदयार्थ्यांना मार्गदर्शन

  मोबाईला चा उपयोग चांगल्या कामासाठी करा  -:-  पोलिसांकडून विदयार्थ्यांना मार्गदर्शन   येथील सार्वजनिक विद्यालयात विद्यार्थाना मार्गदर्शन कर...

 मोबाईला चा उपयोग चांगल्या कामासाठी करा  -:- पोलिसांकडून विदयार्थ्यांना मार्गदर्शन  

येथील सार्वजनिक विद्यालयात विद्यार्थाना मार्गदर्शन करताना सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ मुख्याध्यापक ए जे कदम एम ए बाविस्कर आदी मान्यवर

अडावद प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अडावद( ता१५.) चोपडा मोबाईलचा उपयोग चांगल्या कामासाठी करा . वेळेला महत्व दया  

अभ्यास करून पोलीस अधिकारी व्हा  अभ्यास करा मोठे व्हा  

अलीकडच्या काळात अल्पवयीन मुला मुलीसोबत घडणाऱ्या वाढत्या घटनांच्या पाशर्वभूमीवर अडावद . पोलीस प्रशासनाने सक्रिय भूमिका घेतली आहे  याचाच एक भाग म्हणून  

येथील सार्वजनिक विद्यालयामध्ये पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थी आणि . विद्यार्थीनी साठी  विशेष मार्गदर्शन सत्र घेण्यात आले   

या सत्रात  येथील सहायक पोलिस निरीक्षक  प्रमोद वाघ . हवलदार श्री तडवी महिला पोलीस तनुजा तडवी  वैशाली बाविस्कर  पल्लवी जाधव . यांनी विद्यार्थ्यांना    विविध विषयांवर  मार्गदर्शन . केले 

यावेळी  सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ श्री तडवी  तनूजा तडवी वैशाली बाविस्कर पल्लवी जाधव यांचे शाल पुष्प देऊन मुख्याध्यापक ए जे कदम पर्यवेक्षक एम ए बाविस्कर व सर्व शिक्षक व शिक्षीका यांनी त्यांचे स्वागत केले  

यावेळी श्री वाघ यांनी मार्गदर्शनात सांगितले की मोबाईलचा सुरक्षित वापर गुड टच बॅड टच सायबर क्राईम पासून संरक्षण सोशल मीडियाचा जबाबदार वापर  वाहतू किचे नियम  यासारख्या दैनदिन जीवनाशी निगडीत महत्वाच्या विषयांवर सविस्तर माहिती . देण्यात आली  

या व्यतिरिक्त पोलीस काका  पोलिस दिदी योजना आणि डायल ११२ या आत्पकालीन सेवांचा वापर  कसा करावा  याबाबतही  विद्यार्थ्याना माहिती देण्यात आली तसेच वाईट मार्गाचा अवलंब न करणे  गुरुजनांचा आदर करणे  आणि अल्पवयात लग्न न करणे  या सारख्या सामाजिक  आणि नैतिक मूल्या वरही मार्गदर्शन करण्यात आले  

या उपक्रमामुळे  विद्यार्थ्यानमध्ये  सुरक्षिततेविषयी  जागरूकता निर्माण होऊन त्यांना योग्य दिशा मिळेल अशी अपेक्षा  श्री वाघ  व पोलीस दिदी दामिनी पथक यांनी व्यक्त केली    यावेळी मुख्याध्यापक ए जे कदम यांनी ही विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. यावेळी सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते   या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार  सचीन पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षीका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले .

No comments