कनिष्ठ महाविद्यालयीन इतिहास परिषदेला बहुमान : विभागीय सचिव प्रा राजेंद्र चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित... भरत कोळी यावल ता.प्र...
कनिष्ठ महाविद्यालयीन इतिहास परिषदेला बहुमान :
विभागीय सचिव प्रा राजेंद्र चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित...
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
कनिष्ठ महाविद्यालयीन इतिहास परिषदेच्या नाशिक विभागाचे सचिव तथा मराठा विद्या प्रसारक संस्था जळगाव संचलित श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हातेड येथील कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. राजेंद्र साहेबराव चव्हाण यांना नुकत्याच राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने शिर्डी येथे सन्मानित करण्यात आले. बी द चेंज फाउंडेशन शिर्डी ,अहिल्यानगर या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार पटकावत त्यांनी शाळेसोबतच परिषदेचा ही नावलौकिक वाढविला आहे.
आपल्या अध्यापनासोबतच विविध उपक्रम राबवत त्यांनी आपल्या कार्यक्षमतेची छाप निर्माण केली आहे. त्यांच्या या कार्याला प्रेरणा मिळावी म्हणून बी द चेंज फाउंडेशन च्या वतीने त्यांचा हा गौरव करण्यात आला आहे.
प्रा. राजेंद्र चव्हाण हे यशाप्रीत्यर्थ कनिष्ठ महाविद्यालयीन इतिहास परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष आदरणीय प्रा. सुनील शिंदे, राज्य उपाध्यक्ष, सौ स्मिता जयकर, राज्य सचिव डॉ. नितिन देवतळे, राज्यकोषाध्यक्ष प्रा. रंजन चौधरी, प्रा. बाळासाहेब चावरे, प्रा भुजाबा माने, प्रा. अभिजीत पवार, कनिष्ठ महाविद्यालयीन इतिहास परिषदेचे नाशिक विभाग अध्यक्ष आदरणीय प्रा. साहेबराव कासव, नाशिक विभाग कार्यकारणी सदस्य पंकज शिंदे तसेच राज्य कार्यकारणी आणि विविध विभाग तसेच जिल्हा कार्यकारणी मधील सर्व मान्यवर पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील कार्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments