उषा मच्छिंद्र जगताप यांचा सेवापूर्ती निमित्त सन्मान ! श्रीरामपूर / प्रतिनिधी: (संपादक -:- हेमकांत गायकवाड) तालुक्यातील खासदार गोविंदरावजी ...
उषा मच्छिंद्र जगताप यांचा सेवापूर्ती निमित्त सन्मान !
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
तालुक्यातील खासदार गोविंदरावजी आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल शिरसगांव व महाविद्यालयाच्या ३४ वर्षे सेवेतून सेवा निवृत्त झालेल्या ज्येष्ठ शिक्षिका उषा मच्छिंद्र जगताप यांच्या सेवापूर्ती निमित्त महाविद्यालयाच्या वतीने सेवापूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी प्राचार्य सुभाष काळे व सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी यांच्या वतीने मानपत्र व शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. प्राचार्य काळे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. उषा मच्छिंद्र जगताप व मच्छिंद्र जगताप या दोघांचे या शाळेत शिक्षक पदावर कार्य केले आहे.व शाळा उभारणीच्या वेळेस मोलाचे योगदान दिले व दोन पिढ्या विद्यार्थी घडविले असे त्यांनी सांगितले. उषा मच्छिंद्र जगताप माजी मुख्याध्यापक मच्छिंद्र जगताप, राहुल जगताप, आशा दांगट आदींनी मनोगत व्यक्त केले. जगताप कुटुंबाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले. सूत्रसंचालन करून प्रकाश बागुल यांनी आभार मानले.
वृत्त विशेष सहयोग
डॉ.शरद दुधाट (सर) श्रीरामपूर
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
No comments