Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गुरुपौर्णिमेनिमित्त रंगला गुरूंचा सन्मान सोहळा

  गुरुपौर्णिमेनिमित्त रंगला गुरूंचा सन्मान सोहळा  अजीजभाई शेख /:राहाता: (संपादक -:- हेमकांत गायकवाड) भारतीय संस्कृतीतील गुरू- शिष्य परंपरेचे...

 गुरुपौर्णिमेनिमित्त रंगला गुरूंचा सन्मान सोहळा 


अजीजभाई शेख /:राहाता:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

भारतीय संस्कृतीतील गुरू- शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करणारी गुरुपौर्णिमा तालुक्यातील लोणी येथील प.डॉ.वि.विखे पाटील विद्यालयात नुकतीच मोठ्या उत्साह आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी मंगलगीत सादर केले. मुख्याध्यापक लक्ष्मण रकटे यांनी प्रास्ताविकातून गुरुपौर्णिमेचे मनोगत व्यक्त केले.

विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांद्वारे गुरूंच्या मार्गदर्शनाचे महत्त्व सांगून  गुरूर्ब्रह्मा, गुरूर्विष्णु, या गुरुस्तोत्राचे सादरीकरण करून गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली. 

यावेळी  कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लोहगांव येथील गंगागिरी महाराज गुरुकुल आश्रमाचे संस्थापक  ह.भ.प. संदीप चेचरे महाराज हे प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, व्यास हे एक व्यक्तीचे नाव नसून एक विचार आहे. व्यास जसा वाढत जातो तसतसे विचारांचे क्षेत्र हे व्यापक बनत जाते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य लक्ष्मण रकटे यांच्यासह उपमुख्याध्यापक संदीप डहाळे, पर्यवेक्षक शोभा कडू, सुभाष भुसाळ, सांस्कृतिक विभाग प्रमुख सविता दाभाडे व शितल इंगोले हे उपस्थित होते. प्राचार्य लक्ष्मण रक्त यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दहावीतील विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

वृत्त विशेष सहयोग

डॉ.शरद दुधाट (सर) श्रीरामपूर 


वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments