रासेयो स्वयंसेवकांनी समाजाभिमुख कार्य करणे काळाची गरज - डॉ. संजीव साळवे मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मु...
रासेयो स्वयंसेवकांनी समाजाभिमुख कार्य करणे काळाची गरज - डॉ. संजीव साळवे
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर येथील श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एकक व रासेयो विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३० जुलै २०२५ रोजी मुक्ताबाई पालखी आगमन सोहळ्यानिमित्त संत मुक्ताबाई मंदिर, कोथळी येथे "निर्मल वारी, हरित वारी, प्लास्टिक,थर्माकोल, कचरामुक्त वारी" या अभियानाप्रसंगी श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजीव साळवे यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानातून रासेयो स्वयंसेवकांना आणि उपस्थित वारकऱ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्व व उपयोगिता उदाहरणादाखल पटवून दिली. तसेच रा से यो स्वयंसेवकांनी समाजाभिमुख कार्यात पुढाकार घ्यावा असे उपस्थितांना आवाहन केले.
या अभियानाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एच. ए. महाजन यांचे मार्गदर्शन लाभले.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. डी. एन. बावस्कर यांनी केले. त्यात त्यांनी या अभियानाच्या आयोजनामागील भूमिका व महत्त्व विशद केले. या अभियानांतर्गत संत मुक्ताबाई पालखी आगमन सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या भोजनासाठी महाविद्यालयातर्फे पर्यावरण पूरक वातावरण निर्माण होण्यासाठी व प्रदूषण रोखण्यासाठी केळीचे पाने व कागदी ग्लास देण्यात आले. तसेच महाविद्यालयातील ११८ रासेयो स्वयंसेवकांनी या सोहळ्यात आलेल्या वारकऱ्यांना विविध सेवा पुरविण्यासाठी सक्रिय सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. कृष्णा गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. रंजना झिंजोरे यांनी केले.या अभियानाप्रसंगी महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. संजीव साळवे, उपप्राचार्य डॉ. वंदना चौधरी ,प्राध्यापक वृंद , शिक्षकेतर कर्मचारी वृंद व राष्ट्रीय सेवा योजना एककातील ११८ स्वयंसेवकांनी सक्रियपणे हातभार लावला.
No comments