adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मानवाने बाह्य अंगाने नव्हे तर मनाने निर्मळ असायला हवे :- भंते सुमेधजी नागसेन

 मानवाने बाह्य अंगाने नव्हे तर मनाने निर्मळ असायला हवे :- भंते सुमेधजी नागसेन  लातूर/ निलंगा,दि.२७ (उत्तम माने) (संपादक -:- हेमकांत गायकवाड)...

 मानवाने बाह्य अंगाने नव्हे तर मनाने निर्मळ असायला हवे :- भंते सुमेधजी नागसेन 



लातूर/ निलंगा,दि.२७ (उत्तम माने)

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मानवाने  बाह्यअंगाने नव्हे तर मनाने निर्मळ असण्याची आज काळाची गरज आहे. आपल्या स्वतःच्या कर्मामुळेच  स्वतःला चांगले अथवा वाईट परिणाम भोगावे लागतात म्हणुन आपण नेहमी सत्कर्म केले पाहिजे एकमेकांनी - एकमेकांचे म्हणणे ऐकायला हवे  जेष्ठांचा मान - सन्मान करायला हवा त्याचप्रमाणे प्रत्येकांनी शिलाचे पालन करावे नेहमी सत्कर्म करावे ही आजच्या  काळाची गरज आहे असे प्रतिपादन भंते सुमेधजी नागसेन यांनी केले.


ते बुद्ध धम्म वर्षावास पुनित पर्वा निमित्ताने वैशाली बुद्धविहार बौद्धनगर लातूर येथे पु.भिक्खु सुमेधजी नागसेन यांच्या धम्मदेसनेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. तत्पूर्वी भ.बुद्ध व डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमांना पुष्प व पुष्पमाला अर्पण करून  बुद्धवंदना घेण्यात आली. या कार्यक्रमाला राम कोरडे यांनी भोजन दान तर राजु कांबळे यांनी खिरदान दिले.

यावेळी डॉ.प्रा. दुष्यंत कटारे यांची प्राचार्य पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान करून  सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला भरत कांबळे,महादु गायकवाड ,सुर्यभान लातूरकर,गौतम चिकाटे,डि. के कांबळे,जगन्नाथ सुरवसे,ईश्वर कांबळे,कुमार सोनकांबळे,लता चिकटे,,आशा बानाटे,सविता चिकाटे,लता गायकवाड ,लता कांबळे,आशा गायकवाड ,ललीता सिरसाट यांचे सह बौद्ध उपासक - उपासिका बालक - बालिका मोठ्या प्रमाणात  उपस्थित  होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बोधाचार्य केशव कांबळे केले.

No comments