Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पोदार इंटरनॅशनल स्कूल, अक्लुद येथे विद्यार्थी परिषद समितीची स्थापना

  पोदार इंटरनॅशनल स्कूल, अक्लुद येथे विद्यार्थी परिषद समितीची स्थापना भरत कोळी यावल ता.प्र. (संपादक -:- हेमकांत गायकवाड) दि. १० जुलै २०२५ पो...

 पोदार इंटरनॅशनल स्कूल, अक्लुद येथे विद्यार्थी परिषद समितीची स्थापना


भरत कोळी यावल ता.प्र.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

दि. १० जुलै २०२५ पोदार इंटरनॅशनल स्कूल, अक्लुद येथे आज विद्यार्थी परिषद समितीची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली. या समितीतील विद्यार्थ्यांची निवड पारदर्शक मतदान पद्धतीने करण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८:०० वाजता दीपप्रज्वलनाने झाली. हा पवित्र विधी शाळेचे आदरणीय प्राचार्य श्री. सचिन बनसोडे, उपप्राचार्या सौ. रेखा मुळे आणि पोदार प्रेपच्या मुख्याध्यापिका सौ. मनिषा शृंगी यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सरस्वती वंदना सादर केली आणि इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्यांनी सुरेल स्वागतगीत सादर करून वातावरणात उत्साह निर्माण केला.या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थी परिषद समितीतील सदस्यांच्या पालकांची उपस्थिती, जी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली.


विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी शिस्तबद्ध मार्चपास्ट सादर करत संयम आणि एकता यांचे दर्शन घडवले. त्यानंतर प्राचार्य श्री. सचिन बनसोडे यांच्या हस्ते शाळेचा ध्वज फडकावण्यात आला. विद्यार्थ्यांना त्यांचे कर्तव्य आणि नेतृत्वाची जाणीव करून देणारे  बॅजेस व शाशे  त्यांचे पालक स्वतः विद्यार्थ्यांना प्रदान करून गौरवित केले, ही एक भावनिक आणि अभिमानास्पद क्षण होता.यानंतर नवनिर्वाचित सदस्यांनी आपल्या जबाबदाऱ्या आणि मूल्यांची जाणीव ठेवून नेतृत्वाची शपथ घेतली.

प्रमुख पाहुण्यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात विद्यार्थ्यांना उत्कृष्टतेकडे वाटचाल करत समाजासाठी सकारात्मक योगदान देण्याचा संदेश दिला. प्राचार्य श्री. सचिन बनसोडे सरांनी विद्यार्थी नेत्यांना यशस्वी कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अतिशय परिश्रमपूर्वक तयारी केली होती.

No comments