पंकज मेहेर यांच्या जुन्या वस्तूंच्या संग्रहालयास मुंबईतील इतिहास प्रेमींची सदिच्छा भेट इतिहास केवळ भूतकाळ नसुन तो वर्तमानात शिकवण देऊन भव...
पंकज मेहेर यांच्या जुन्या वस्तूंच्या संग्रहालयास मुंबईतील इतिहास प्रेमींची सदिच्छा भेट
इतिहास केवळ भूतकाळ नसुन तो वर्तमानात शिकवण देऊन भविष्य घडवितो - डॉ.कमर सुरुर
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नगर येथील पंकज मेहेर यांचे संग्रहालय म्हणजे केवळ वस्तूंचं ठिकाण नाही, तर आपल्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा जिवंत दस्तऐवज आहे. ते ज्या प्रकारे इतिहासाला जपण्याचा प्रयत्न करत आहेत, तो आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.
इतिहास हा केवळ भूतकाळ नसतो, तो वर्तमानात शिकवण देतो आणि भविष्य घडवितो.असे प्रतिपादन मखदूम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या सचिव प्रसिद्ध कवयित्री डॉ. कमर सुरूर यांनी केले.
मुंबई येथून इतिहास प्रेमी नगर येथे आले असता त्यांनी इतिहास प्रेमी व ऐतिहासिक वस्तू संग्राह पंकज मेहेर यांच्या वस्तू संग्रहालयास भेट दिली. यावेळी मखदूम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या सचिव प्रसिद्ध कवयित्री डॉ. कमर सुरूर, डॉ.शमा फारुकी, संग्राहलयाचे संचालक पंकज मेहेर, ठाकूरदास परदेसी, अकीला बाजी आदी उपस्थित होते.
मुंबई येथून आलेल्या अकीला बाजी व त्यांच्या सर्व टीमने पंकज मेहेर यांच्या संग्रहालयातील निजाम कालीन, शिवकालीन, ब्रिटिशकालीन अनेक वस्तू तसेच जुने नाणी चलनी नोटा, वृत्तपत्रे, घड्याळ, टेलिफोन, पोस्ट तिकीट, पाकीट, पुस्तके, भांडी अश्या अनेक दुर्मिळ वस्तू बघितल्या व त्यांच्या संग्रहित केलेल्या सर्व गोष्टींचे भरभरून कौतुक केले.
पुढे बोलताना डॉ. कमर सुरूर म्हणाल्या की, मुंबईहून येऊन पंकज मेहेर यांच्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयास भेट देणे ही आमच्यासाठी खूप मोठी बाब आहे. आपल्या या भेटीमुळे केवळ संग्रहालयाचेच नव्हे, तर संपूर्ण शहराचे गौरव वाढले आहे. पंकज मेहेर यांनी गेल्या अनेक वर्षांत अत्यंत मेहनत, चिकाटी आणि निस्वार्थ भावनेने ही दुर्मिळ वस्तूंची संपत्ती संकलित केली आहे.असे नमुद केले.
यावेळी डॉ.शमा फारुकी म्हणाल्या की,पंकज मेहेर यांनी आपल्या अथक मेहनतीने आणि अभ्यासातून अनेक वर्षांपासून या वस्तूंचा संग्रह केला आहे.व अशा संग्रहालयांच्या माध्यमातूनच पुढच्या पिढ्यांना इतिहासाची जाणीव होईल, असे मत व्यक्त केले.
आलेल्या सर्व मान्यवरांचा पंकज मेहेर यांनी पुस्तके व चांदबीबी महालाची प्रतिकृती भेट देऊन सन्मान केला.
वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अ.नगर
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
No comments