adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

काटे परिवाराने जोपासली सामाजिक बांधिलकी! मातोश्री च्या स्मरणार्थ शिवशाही फाऊंडेशनतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

  काटे परिवाराने जोपासली सामाजिक बांधिलकी! मातोश्री च्या स्मरणार्थ शिवशाही फाऊंडेशनतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप जि.प.शाळा कोळपिंप्री येथे शैक...

 काटे परिवाराने जोपासली सामाजिक बांधिलकी!

मातोश्री च्या स्मरणार्थ शिवशाही फाऊंडेशनतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

जि.प.शाळा कोळपिंप्री येथे शैक्षणिक साहित्य वाटप करतांना संजीव काटे, जयेशकुमार काटे व आदी मान्यवर

किरण चव्हाण अमळनेर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अमळनेर - येथील काटे बंधूनी आपली स्वर्गीय मातोश्री विमलबाई प्रतापराव काटे यांच्या पुण्यस्मरण दिना निमित्त शिवशाही फाउंडेशनतर्फे मदतीचा हात पुढे केला आहे. गरीब- गरजू शेतकरी व शेतमजुरांच्या मुलामुलींना शैक्षणिक साहित्य वाटप करून अनोख्या पध्दतीने आईला भावपूर्ण आदरांजली अर्पण केली आहे.

कोळपिंप्री (ता.पारोळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना (कै) विमलबाई प्रतापराव काटे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त शिवशाही फाऊंडेशन (अमळनेर) यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना शालोपयोगी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच संजीव काटे होते. यावेळी वि.का. सोसायटीचे माजी चेअरमन गिरीश काटे, माजी सरपंच दत्तात्रय काटे, शिवशाही फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष जयेशकुमार काटे,  सुरेश काटे, भगवान काटे, जुलाल काटे, प्रमोद काटे, महेंद्र सोनवणे, प्रकाश काटे, शिवशाही फाउंडेशन चे सचिव उमेश काटे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आत्माराम चौधरी, प्राथमिक शिक्षक सुनिल एम. काटे व ज्ञानेश्वर पाटील आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शैक्षणिक व  सामाजिक उपक्रम राबविणे गरजेचे आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून आईवडिलांचे स्मरण करून त्यांचे ऋण निर्देश करणे ही काळाची गरज असल्याचे ही सांगितले. उमेश काटे यांनी प्रास्ताविक केले. आत्माराम चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. 

सडावण येथे शैक्षणिक साहित्य वाटप

सडावण (ता. अमळनेर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत स्वर्गीय विमलबाई प्रतापराव काटे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण निमित्त शिवशाही फाउंडेशन तर्फे  शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंकज पाटील यांच्यासह समिती सदस्यांच्या हस्ते पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी ग्रेडेड मुख्याध्यापिका सरला बाविस्कर, पदवीधर शिक्षक राजेंद्र पाटील, उपशिक्षक शामकांत बागड, मनीषा पाटील, मेघा सोनवणे, नितीन शिंदे, रूपाली जाधव, युवा प्रशिक्षणार्थी वर्षाराणी पाटील आदी उपस्थित होते.

पारोळा येथे शैक्षणिक साहित्य वाटप

पारोळा येथील उत्कर्ष प्राथमिक विद्यामंदिर येथे स्वर्गीय विमलबाई प्रतापराव काटे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण निमित्त शिवशाही फाउंडेशन तर्फे  शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक संदीप  पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षिका यांच्या हस्ते पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी उपशिक्षक जयेशकुमार काटे,जितेंद्र बोरसे, राजेंद्र मराठे अशोक गुंजाळ, शीतल पाटील,मनिषा पाटील,वैशाली चव्हाण आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.

----

कोळपिंप्री (ता.पारोळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालोपयोगी शैक्षणिक साहित्य वाटप प्रसंगी उपस्थित मान्यवर, पदाधिकारी व शिक्षक

No comments