Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

डॉ. चारुशीला बोरोले ( पाळवदे ) यांचा पॅरिस येथील जागतिक परिषदेत उल्लेखनीय सहभाग

  डॉ. चारुशीला बोरोले ( पाळवदे ) यांचा पॅरिस येथील जागतिक परिषदेत उल्लेखनीय सहभाग     पुणे प्रतिनिधी : (संपादक -:- हेमकांत गायकवाड) बेनिकेअर...

 डॉ. चारुशीला बोरोले ( पाळवदे ) यांचा पॅरिस येथील जागतिक परिषदेत उल्लेखनीय सहभाग 


   पुणे प्रतिनिधी :

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

बेनिकेअर मदर अँड चाइल्ड हॉस्पिटलच्या संचालिका व मुख्य वंध्यत्व चिकित्सक डॉ. चारुशीला बोरोले (पाळवदे) यांनी नुकताच आंतरराष्ट्रीय पातळीवरील एक मोठा मानाचा टप्पा गाठला आहे. त्यांनी पॅरिस (फ्रान्स) येथे आयोजित युरोपियन सोसायटी ऑफ ह्युमन रिप्रॉडक्शन (ESHRE) या जगप्रसिद्ध संस्थेच्या वार्षिक परिषदेत सहभागी होऊन आपले मोलाचे मार्गदर्शन दिले.

      महत्वाचे म्हणजे, २९ जून ते ०२ जुलै २०२५ या कालावधीत पार पडलेल्या या परिषदेत जगभरातील तज्ज्ञ, शास्त्रज्ञ आणि संशोधक सहभागी झाले होते. या परिषदेमध्ये वंध्यत्व उपचारातील नवनवीन तंत्रज्ञान, संशोधन आणि जागतिक पातळीवरील प्रगत उपचार पद्धतींचा सखोल आढावा घेण्यात आला.

   डॉ. बोरोले ( पाळवदे ) यांनी एम.बी.बी.एस. नंतर स्त्रीरोग व प्रसूती शास्त्रात एम. एस. ही पदवी मिळवली असून, विशेषतः जर्मनीमध्ये वंध्यत्व चिकित्सेचे विशेष प्रशिक्षण घेतले आहे. जागतिक पातळीवरील अशा महत्त्वपूर्ण परिषदेत पुण्यातील काही निवडकच डॉक्टर्सनी सहभाग घेतला असून, त्या डॉक्टरांमध्ये डॉ. बोरोले यांचा समावेश असणे ही गौरवाची बाब आहे.

   सदर परिषदेत सक्रिय सहभाग घेऊन इतर सहकारी डॉक्टर्सना आपल्या अनुभवातून मार्गदर्शन केल्याबद्दल डॉ. चारुशीला बोरोले यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपल्या कार्याची ठसठशीत छाप पाडत पुणे शहराचे व महाराष्ट्राचे नाव उज्वल केले आहे.

No comments