वन विभागाची धडक कारवाई अवैध बेलन वाहतूक रोखली, मुद्देमाल जप्त प्रतिनिधी :- खलील आर तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज दिनांक २५.७.२०२५ रो...
वन विभागाची धडक कारवाई अवैध बेलन वाहतूक रोखली, मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी :- खलील आर तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज दिनांक २५.७.२०२५ रोजी रात्री मिळालेल्या गुप्त बातमी वरून वनपाल अडावद व राऊंड स्टॉप सह उनपदेव पाटचारी रस्त्याने गस्त करीत असताना अवैद्य अनगड बेलन दोन अज्ञात इसम विना नंबर मोटर साईकलने अवैध वाहतूक करताना दिसून आले. त्यांना पकडण्यासाठी वन विभागाच्या पथकाने पाठलाग केला असता त्यांच्या जवळील वाहन व मुद्देमाल रस्त्याच्या कळेला अंधाराच्या फायदा घेऊन दोघं संशयित पसार झालेत. वाहन व मुद्देमालाची तपासणी केली असता अनगड बेलन साग प्रजातीचे लहान,मोठे 200 नग व दोन विना नंबर Splendor व supper Splendor मोटरसाईकल मिळूनआले सदरची कारवाई ही श्रीमती नीनू सोमराज वनसंरक्षक धुळे,म. श्री जमीर शेख उपसरक्षक यावल,म. श्री समाधान पाटील सहायक वन संरक्षक चोपडा म. श्री प्रशांत साबळे वन क्षेत्रपाल अडावद, यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश साळुंखे वनपाल अडावद श्री राकेश निकुंबे उनपदेव वनरक्षक गजानन कोईगडे वनरक्षक वर्डी इंद्रसिंग पावरा चिंचपाणी वनरक्षक अधीसंख्य वनमजूर प्रकाश सपकाळे वनमजूर राजू पाटील, राजेश जोशी आधी लोकांनी कारवाई केली.

No comments