adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गतिमान काम करण्याचे, तसेच जनतेच्या अडचणी वेळेत सोडविण्याचे आ.जावळेंचे स्पष्ट निर्देश .

  सर्व विभागांनी एकमेकांशी समन्वय ठेवून गतिमान काम करण्याचे, तसेच जनतेच्या अडचणी वेळेत सोडविण्याचे आ.जावळेंचे स्पष्ट निर्देश .  रावेर प्रतिन...

 सर्व विभागांनी एकमेकांशी समन्वय ठेवून गतिमान काम करण्याचे, तसेच जनतेच्या अडचणी वेळेत सोडविण्याचे आ.जावळेंचे स्पष्ट निर्देश . 


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

आ. अमोलभाऊ जावळे यांच्या अध्यक्षतेखाली रावेर मतदार संघातील सर्व विभागांची आढावा बैठक

रावेर/यावल. | रावेर मतदारसंघातील विविध शासकीय विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत महसूल, महावितरण, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास, नगरपरिषद, ग्रामविकास व इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


बैठकीत महसूल विभागाच्या संजय गांधी निराधार योजना, घरकुल, शेती मोजणी, रेशन दुकान या योजनांची सविस्तर आकडेवारी सादर करण्यात आली. नगरपरिषदांच्या स्वच्छता मोहिम, पाणी पुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, रस्त्यांची स्थिती व बचत गट प्रभाग संघ कार्यालयाच्या कामकाजावरही चर्चा करण्यात आली.

महावितरण विभागाच्या कार्याचा आढावा घेताना सबस्टेशन उभारणी, सौरऊर्जा प्रकल्प, वीजपुरवठ्याशी संबंधित शेतकऱ्यांच्या अडचणींवर चर्चा झाली. पोलीस विभागासोबत कायदा-सुव्यवस्था, अवैध गोतस्करी यासारख्या संवेदनशील विषयांवर आढावा घेण्यात आला.

चारमाळी येथील आदिवासी वस्तीच्या सर्वांगीण विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांबाबत प्रांताधिकारी व आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांशी स्वतंत्रपणे चर्चा झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने मतदारसंघातील प्रमुख रस्त्यांची सद्यस्थिती, दिरंगाई व तांत्रिक अडचणींवरही विचारमंथन करण्यात आले.

या बैठकीस प्रांताधिकारी बबन काकडे, यावल तहसीलदार मोहनमाला नाजीरकर, रावेर तहसीलदार बंडू कापसे, आदिवासी प्रकल्प अधिकारी अरुण पवार, फैजपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे, सावदा विभागाचे अभियंता गणेश महाजन, यावल गटविकास अधिकारी मंजुषा गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता जहांगीर तडवी, जिल्हा परिषदेचे अभियंता रवींद्र इंगळे तसेच पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे, विशाल जैस्वाल, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे, विशाल पाटील, हरिदास बोचरे आदी मान्यवर उपस्थित होते.

बैठकीच्या शेवटी आमदार अमोलभाऊ जावळे यांनी सर्व विभागांना परस्पर समन्वय ठेवून गतिमान काम करण्याचे, तसेच जनतेच्या अडचणी वेळेत सोडविण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

No comments