आमोद्या जवळ प्रवाशांनी भरलेली खाजगी बस पुलाखाली कोसळली, एकाचा मृत्यू, २५ ते ३० प्रवासी जखमी फैजपूर भुसावळ रस्त्यावरील घटना रावेर प्रतिनि...
आमोद्या जवळ प्रवाशांनी भरलेली खाजगी बस पुलाखाली कोसळली, एकाचा मृत्यू, २५ ते ३० प्रवासी जखमी
फैजपूर भुसावळ रस्त्यावरील घटना
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक हेमकांत गायकवाड)
फैजपूर - भुसावळ रस्त्यावरील आमोद्या जवळील मोर नदीच्या पुलावरून पुलाचे कठडे तोडून प्रवाशांनी खच्चून भरलेली मध्यप्रदेशातील खाजगी बस पुलाखाली कोसळून भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना आज दिनांक ६जुलै रोजी सकाळी ८:३० वाजेच्या दरम्यान घडली.
आज ६ जुलै सकाळी यावल तालुक्यातील आमोदा- फैजपूर रस्त्यावर इंदोरहून जळगावकडे येणारी प्रवाशांनी भरलेली श्री गणेश लक्झरी खासगी बस पुलाचा कठडा तोडून थेट पुलावरून सुमारे २० ते २५ फूट खाली कोसळली. या भीषण अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून २५ ते ३० प्रवासी जखमी झाल्याचे समजते.
स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. पोलिसाना या बाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलीसही पोहोचले असून
जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अद्याप अपघाताचे कारण समोर आलेले नसले तरी चालकाचे नियंत्रण सुटल्या मुळे अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या ठिकाणी परिसरात या आठवडाभरात अनेक अपघात घडले आहेत.

No comments