adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आदिवासी विकास विभाग अनुदानीत आश्रमशाळा कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मा.आयुक्त, आ.वि.यांचे सोबत झालेल्या चर्चेत मा. आयुक्तांनी घेतले महत्वपूर्ण निर्णय

आदिवासी विकास विभाग अनुदानीत आश्रमशाळा कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मा.आयुक्त, आ.वि.यांचे सोबत झालेल्या चर्चेत मा. आयुक्तांनी घेतले...

आदिवासी विकास विभाग अनुदानीत आश्रमशाळा कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मा.आयुक्त, आ.वि.यांचे सोबत झालेल्या चर्चेत मा. आयुक्तांनी घेतले महत्वपूर्ण निर्णय 


जळगाव प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड) 

दिनांक 3 जुलै 2025 ला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.विक्रमजी गायकवाड व आदिवासी विकास विभाग आश्रमशाळा कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य नाशिक संलग्नित अनुदानित आश्रमशाळा कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निमंत्रित सभेत झालेल्या चर्चेत....

1)कर्मचाऱ्यांना दरमहा मिळणारे वेतन वेळेवर मिळत नाही. त्यामुळे अत्यावश्यक गरजा,गृह कर्ज, वाहन कर्ज, शिक्षण कर्ज अशा कालमर्यादेत बाबी प्रभावित होतात. त्यामुळे वेळेवर वेतन मिळावे. या मागणीवर मा.आयुक्तांनी "अनुदानित आश्रमशाळांचे वेतन दरमहा 5 तारखेच्या आत करावेत असे निर्देश दिलेत.                            

2)अंशदायी पेन्शन योजना DCPS मधील कर्मचारी, राष्ट्रीय पेन्शन योजनेत NPS मध्ये समाविष्ट करून डी.सी.पी.एस.मधील जमा रक्कमेचा हिशेब देण्यात यावा. या मागणीबाबत संघटनेने यापूर्वी झालेल्या बैठकीत आग्रह धरला होता.त्या बाबतचा खुलासा सहसंचालक वित्त यांनी केला की "महाराष्ट्रातील सर्व DCPS कर्मचाऱ्यांच्या निधीचा हिशेब पूर्ण करण्यात आला असून विभागाने जमा केलेला निधी आणि कोषागारातील लेखे यांचे रिकन्सिलेशन चे काम अंतिम टप्प्यात आहे, तसेच या सर्व कर्मचाऱ्यांना NPS योजनेत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव शासनाकडून मंजूर करून घेण्याची प्रक्रिया सुरू असून सदर काम तीन महिन्यात पूर्ण होईल असे आश्वासित करण्यात आले आहे.

3)एखादी शाळा बंद झाल्यावर कर्मचाऱ्यांचे नवीन शाळेवर समायोजन होईपर्यंतच्या प्रतीक्षा कालावधीचे वेतन कर्मचाऱ्यांना मिळाले पाहिजे या मागणीवर मा.आयुक्तांनी शिक्षकांच्या बाजूने सकारात्मक भूमिका घेतली. शाळा बंद होण्याच्या घटनेत शिक्षकांची चूक नसल्यामुळे शिक्षकांना वेतन मिळालेच पाहिजे, असा ठाम पुनरुच्चार करून पुन्हा प्रस्ताव पाठवण्याबद्दल आदेशित केले आहे.

4) 1155 कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन मिळण्याबाबत प्रस्तावित माहितीत अनेक कर्मचाऱ्यांच्या नावासमोर त्यांचा रुजू दिनांक लिहीला नसल्यामुळे प्रस्ताव अपूर्ण राहिला आहे. त्यासाठी पुन्हा रुजू दिनांकाची माहिती मिळविण्याची प्रक्रिया सुरू असून आठ दिवसाच्या आत फाईल मंजुरीसाठी सादर करण्याबाबत आयुक्त महोदयांनी संबंधितांना आदेशित केले आहे. 

5)पहारेकरी कर्मचाऱ्यास वेतन श्रेणी मिळण्याबाबतचा विषय न्यायप्रविष्ठ असल्यामुळे त्यावर सध्याच कोणताही निर्णय घेऊ शकत नाही असे आयुक्त महोदयांनी सांगितले.

6).. लिपिक, अधीक्षक, अधीक्षिका व चतुर्थ श्रेणी कर्मचारी हे शिक्षकेतर कर्मचारी असल्यामुळे त्यांना आश्वासित प्रगती योजना..(10.20..30.) ही योजना लागू करण्यात यावी, याबाबत आयुक्त महोदय अनुकूल असून त्यासंबंधीचा शासन निर्णय निर्गमित होण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल असे सांगितले. 7)अधीक्षक,अधीक्षिका दीर्घ रजेवर गेले असता त्या ठिकाणी प्रतिनियुक्तिवर कर्मचारी नेमण्याबाबत संस्थेला आदेशित करावे ही मागणी मा.आयुक्त महोदयांनी मान्य केली असून संस्थेला तसे निर्देश देण्यात येईल असे त्यांनी सांगितले

.8)) बंद पडलेल्या आश्रम शाळा कर्मचाऱ्यांचे तात्काळ समायोजन करण्याबाबत चर्चा केली असता आज मितीला सर्व कर्मचाऱ्यांचे समायोजन झाले असून दोन दिवसापूर्वीच त्यांचे आदेश निर्गमित झाले आहेत. सध्या कोणताही कर्मचारी समायोजनासाठी प्रलंबित नाही, असे मा.आयुक्तांनी सांगितले

9) शालेय शिक्षण विभाग, वित्त विभाग व सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयात *आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या अनुदानित आश्रम शाळा* असा स्पष्ट उल्लेख शासन निर्णयात नसल्यामुळे अनेक योजना अनुदानित आश्रम शाळेच्या कर्मचाऱ्यांना लागू होत नाही. ही महत्त्वाची त्रुटी मा.आयुक्ताच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी ते त्वरित मान्य करून विविध विभागाच्या शासन निर्णयामध्ये आदिवासी विकास विभागाच्या अनुदानित आश्रमशाळा असा शब्दप्रयोग करण्याबाबत प्रस्ताव पाठवा असे आदेशित केले आहे.

*10)* अनुदानित आश्रम शाळेमध्ये कला,क्रीडा व संगणक शिक्षक भरती करण्याबाबत तसेच आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शासनाच्या सांस्कृतिक विभाग घेत असलेल्या बालनाट्य स्पर्धेत पाठविण्याबाबत प्रस्ताव संस्थापक अध्यक्ष विक्रम गायकवाड यांनी आग्रही भूमिका घेऊन त्याचे महत्त्व पटवून दिल्यामुळे मा.आयुक्त महोदया या विषयावर पूर्णपणे अनुकूल झाल्या आणि या वर्षी पासून नाट्य, संगीत गायन या विषयावर काम सुरू करण्याचे आश्वासन मा.आयुक्तांनी दिले. आश्रमशाळा विद्यार्थ्यांमधील गायक,लेखक,कवी,

खेळाडू, कलावंत यांचा शोध घेऊन त्याना मंच उपलब्ध करून द्यावा, सोबतच आश्रम शाळेतील कार्यक्रमात रुची असणाऱ्या शिक्षकांची नावे पाठविण्याबद्दल देखील मा. आयुक्तांनी आदेशित केले आहे. कला व सांस्कृतिक विषयावर काम सुरू करण्याबाबत संघटनेने सुचविल्यामुळे त्यांनी संघटनेचे विशेष आभार देखील व्यक्त केले.

याप्रसंगी आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.विक्रम गायकवाड, शासकीयचे राज्याध्यक्ष संतोष राऊत, राजेश पाटील, राज्याध्यक्ष (अनुदानित), संजयजी जाधव, सरचिटणीस (शासकीय), निशाल विधाते राज्य सचिव (अनुदानित), साहेबराव मोहोड (विदर्भ अध्यक्ष), मनोज ठाकरे (प्रकल्प अध्यक्ष- यावल), लक्ष्मण मते (विभागीय अध्यक्ष- ठाणे), रखमाजी भड (राज्य कार्यकारणी सदस्य), श्रीमती. सारिका गायकवाड (प्रकल्प अध्यक्ष- शहापूर), नामदेव वाजे (प्रकल्प अध्यक्ष- कळवण), शंकर माने (प्रकल्प सचिव- पांढरकवडा), श्री चंद्रकांत शिरोळे (प्रकल्प अध्यक्ष- राजुर), तसेच श्री.कपील पाटील ,सहसंचालसक (वित्त) श्री.आर.आर.पाटील, सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते...

No comments