भारतीय जनता पार्टी त्रंबकेश्वर सरचिटणीस पदी कैलास बोडके यांची निवड प्रतिनिधी- जयवंत हागोटे (संपादक -:- हेमकांत गायकवाड) भारतीय जनता पार्टी...
भारतीय जनता पार्टी त्रंबकेश्वर सरचिटणीस पदी कैलास बोडके यांची निवड
प्रतिनिधी- जयवंत हागोटे
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भारतीय जनता पार्टी त्र्यंबकेश्वर तालुक्याची कार्यकारणी जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण,जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,प्रदेश महामंत्री विजय चौधरी,विक्रांत पाटील,संघटन मंत्री रवी,अनासपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा अध्यक्ष सुनील बच्छाव यांच्या सूचनेनुसार त्रंबकेश्वर तालुका अध्यक्ष सुयोग वाडेकर यांनी कार्यकारणी जाहीर केली. या कार्यकारणीत नवनियुक्त पदाधिकारी कैलास भाऊ बोडके यांची त्र्यंबकेश्वर तालुका सरचिटणीस पदी निवड करण्यात आली.व उत्तम लिलके यांची त्रंबकेश्वर चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक वर्षे प्रभावीपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याला हे पद दिल्याने तालुक्यातील युवकांना अतिशय उत्साहाचे वातावरण आहे कैलास बोडके यांना याबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सांगितले की हे पद म्हणजे बहुमान नसून एक जबाबदारी आहे आणि या माध्यमातून परिश्रम घेऊन तालुक्यातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचे काम मी करणार आहे गावोगावी जाऊन भूथप्रमुखांच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहे आणि जनतेच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे तसेच माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून ही महत्त्वपूर्ण जबाबदारी दिल्याने मी ती नक्की पार पाडेल.
No comments