adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बाल संस्कार विद्या मंदिरात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी.

बाल संस्कार विद्या मंदिरात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी.  भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक हेमकांत गायकवाड) विठ्ठल - रुक्मिणी आणि आष...

बाल संस्कार विद्या मंदिरात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी. 



भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक हेमकांत गायकवाड)

विठ्ठल - रुक्मिणी आणि आषाढी एकादशीचे महत्व लहान चिमुकल्यांना  समजावे तसेच भक्तीचा संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजवावा या उद्देशाने बाल संस्कार विद्या मंदिर व बालवाडीतील लहान मुलामुलींनी वेशभूषेसह कृतीयुक्त भजन गायन करून शाळेतील पटांगणावर भक्तिमय वातावरण निर्माण केले. उपस्थित पालक, शिक्षक व विद्यार्थी भक्तीत तल्लीन झाले. सदर कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तीची पूजा बालवडीच्या मुख्याध्यापिका शरयू कवडीवाले यांच्या हस्ते करण्यात आली.ज्ञानोबा माऊली ज्ञानराज माऊली च्या गजरात दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला. विठ्ठल मंदिरात विठ्ठलाची आरती करून सर्व विद्यार्थी व पालकांनी दर्शन घेऊन दिंडीचा समारोप करण्यात आला. सदर कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुनील माळी सर यांच्या मार्गदर्शनाने सर्व शिक्षक बंधू भगिनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकाऱ्याने उत्साहात पार पडला

No comments