“जागर भक्तीचा, निनाद अभंगाचा” चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश पाटील मह...
“जागर भक्तीचा, निनाद अभंगाचा”
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश पाटील महाविद्यालयाच्या मराठी विभाग व संगीत विभागाच्या संयुक्त विद्यमाने देवशयनी आषाढी एकादशी निमित्त आज दि.५/०६/२०२५ दशमीच्या दिवशी "जागर भक्तीचा,निनाद अभंगांचा" या भक्ती संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते पंढरपूरच्या श्री पांडुरंगाच्या प्रतिमेचे, मूर्तीचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपद महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.के.एन.सोनवणे यांनी भूषविले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना श्री.निवृत्ती बी.पाटील यांनी वारीचे महत्व व रिंगण सोहळा आयोजन मागील तात्विक दृष्टीकोन विशद केला.
याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.ए.बी.सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ.आर.एम.बागुल, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री.एस.पी.पाटील, पर्यवेक्षक श्री.ए.एन.बोरसे, समन्वयक डॉ.एस.ए.वाघ, समन्वयक श्री.पी.एस.पाडवी आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी भक्ती संगीताच्या कार्यक्रमात इयत्ता ११ वी व १२ वी कला व वाणिज्य शाखेच्या तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील खालील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे. सहभाग घेऊन सुरेल भक्ती गीतांचे सादरीकरण केले.गीत सादर करताना विद्यार्थ्यांमध्ये कु.आरती पाटील रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी व यमुनेच्या तिरी
चि.कमलेश महाजन व कु.नंदिनी बारेला विठू माऊली तू मुली जगाची
कु.दिव्या धनगर व कु.कोमल धनगर व संगीत विभाग समूह तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चाल ना
कु.योगिनी पाटील पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला
चि.तथागत शिरसाठ माझे माहेर पंढरी
चि.जयेश महाजन विठ्ठलाची हाक व भजनाविना काळ
चि.भूषण वार्डे विठ्ठला तू वेडा कुंभार
संगीत विभाग समूह पायोजी मैने राम रतन धन पायो
कु.मोनिका व कु.रोशनी चौधरी राधे चल माझ्या गावाला जाऊ
कु.भाग्यश्री पानपाटील व कु.जानव्ही पाटील शिवभोळा चक्रवर्ती
तर शिक्षक वृंदांमध्ये
श्री. प्रमोद पाटील , कानडा राजा पंढरीचा
श्री.किशोर खंडाळे ,पांडुरंग नामी व देखोनिया तुझ्या रूपाचा
श्री.निवृत्ती पाटील, सकळांच्या पाया माझी विनवणी l मस्तक चरणी ठेवितसे ll
श्री.रणजीत पाटील , पंढरपुरात काय वाजत गाजत
इत्यादींनी भक्ती गीत सादर केले
या कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना प्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे म्हणाले की, मराठी साहित्यात संतांची भूमिका व प्रबोधनवादी परंपरा फार मोठी आहे. मराठी साहित्यात संत साहित्याचे भरीव योगदान असून मराठी भाषा समृद्धीत संत साहित्याने मोलाची भर टाकली आहे.
या कार्यक्रमाचे नियोजन कनिष्ठ मराठी विभाग मार्फत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता बारावी वाणिज्य वर्गाच्या विद्यार्थिनी कु.कावेरी पाटील व कु.जान्हवी पाटील यांनी केले तर आभार तसेच कार्यक्रमाच्या शेवटी कु.आरती पाटील हिने पसायदान सादर केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.एम.एल.भुसारे, श्री.संदीप पाटील, सौ.पुष्पा दाभाडे, श्री.भूषण बिरारी, श्री.अभिजीत पाटील, श्री.विवेकानंद शिंदे,श्री.प्रमोद पाटील, श्री दीपक करंकाळ , श्री विशाल बोरसे, श्री.संदीप देवरे, श्री.बी.के.जाधव, श्री.दिनेश आलम, श्री.निलेश सोनवणे, श्री.पिंटू मांडोळे, श्री.राकेश काविरे, श्री.जीवन बागुल, कल्पेश पाटील, किरण साळुंखे आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे शिक्षक-शिक्षकेत्तर बंधू-भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments