साकळी ग्रामपंचायत मार्फत पाच वर्षे वयाच्या १०० वृक्षांचे वृक्षारोपण सरपंच दिपक पाटील यांची व्यापक संकल्पना (संपादक -:- हेमकांत गायकवाड) या...
साकळी ग्रामपंचायत मार्फत पाच वर्षे वयाच्या १०० वृक्षांचे वृक्षारोपण
सरपंच दिपक पाटील यांची व्यापक संकल्पना
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : - साकळी येथील ग्रामपंचायत मार्फत लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील यांच्या व्यापक दृष्टिकोनातून गावात वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.नेहमीप्रमाणे लहान झाड न आणता पाच वर्ष वयाचे व १२ फुट उंचीचे १०० झाडे आणून ते गावात विविध सार्वजनिक जसे की शाळा, धार्मिक स्थळे,सार्वजनिक मोकळी जागा,वापररस्त्यालगत ठिकाणी लावण्यात आलेले आहे.या आगळ्यावेगळ्या उपक्रमाने येत्या पुढील काळात आपले गाव हरित गाव म्हणून ओळखले जाईल.याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच दिपक पाटील , माजी ग्रा.पं.सदस्य साहेबराव बडगुजर,शरद बिराडे, ग्रामपंचायत सदस्य,परमानंद बडगुजर,फक्रुद्दीन कुरेशी ,शे अकबर शे हुसेन, खतीब तडवी, मुकेश बोरसे , नरेंद्र मराठे यांचे सह सामाजिक कार्यकर्ते उमेश बडगुजर, शे.सलीम शे.मजीद, मुकेश खेवलकर, फैसलखान फारूखखान, शाहरुख खान,पंकज जैन,नाना भालेराव, भुरा भिल्ल व परिसरातील नागरिक उपस्थित होते.वृक्षारोपणाचा उपक्रम ज्या-ज्या वेळेस शक्य होईल त्या त्यावेळी सातत्याने राबवला जाईल.तसेच जास्त वयाचे वृक्ष आणून ते व्यवस्थित जगण्यासाठी काळजी घेतली जाईल.असे सरपंच दिपक पाटील यांनी सांगितले.
No comments