प्रांताधिकाऱ्यांना अरेरावी प्रकरणावरून महसूल संघटनांचा निषेध, काळीफीत लावून आंदोलन भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायक...
प्रांताधिकाऱ्यांना अरेरावी प्रकरणावरून महसूल संघटनांचा निषेध, काळीफीत लावून आंदोलन
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर उपविभागीय अधिकारी बबन जी काकडे यांच्या दालनात फैजपुर चे माजी नगराध्यक्ष निलेश उर्फ पिंटू राणे यांनी केलेली दांडगाई आणि अपमानजनक वर्तन प्रकरणी महसूल कर्मचारी संघटना व ग्राम महसूल अधिकारी संघटना यांच्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. राणे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांशी उद्दाम भाषा वापरून त्यांच्या मान-सन्मानाला ठेच देणारे संवाद करत त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याचे कर्मचारी अधिकारी यांच्या निदर्शनास आले आहे.
या प्रकारावर संतप्त प्रतिक्रिया देत महसूल संघटनांनी जिल्हाधिकारी जळगाव आयुष प्रसाद यांच्याकडे निवेदनाद्वारे तीव्र निषेध नोंदवला असून, संबंधितावर कठोर कायदेशीर कारवाई झाल्याशिवाय काम बंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला होता. मात्र, जिल्हाधिकारी प्रसाद यांनी योग्य तो समतोल राखत आंदोलनामुळे शेतकरी, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्यावर परिणाम होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन दोन्ही संघटनांना केले
No comments