adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर येथील विस्डम इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार

  फैजपूर येथील विस्डम इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार  इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर येथील विस्डम इंग्लिश...

 फैजपूर येथील विस्डम इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार 


इदू पिंजारी फैजपूर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर येथील विस्डम इंग्लिश  स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, एसएससी परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण विद्यार्थी यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरवपर सत्कार करण्यात आला. याच वेळी संस्थेचे अध्यक्ष शाकीर मलिक यांचे चिरंजीव डॉक्टर कामिल मलिक यांनी वैद्यकीय शिक्षण घेऊन डिग्री प्राप्त केल्याने त्यांचाही हृदय सत्कार करण्यात आला.   या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अब्दुल रऊफ जनाब, प्रमुख पाहुणे सय्यद रफत अली जनाब, विस्डम स्कूलचे अध्यक्ष शाकीर मलिक, संस्थापक अध्यक्ष शरीफ मलिक सर, चेअरमन इरफान सर, प्रिन्सिपल शबनम मॅडम, अल्खीजर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. दानिश,  केंद्र प्रमुख गुलाम गौस खान, प्रा. उमाकांत पाटील सर, पत्रकार सलीम पिंजारी, निसार जनाब, शेख दानिश शेख अख्तर, अबुबकर जनाब, खलील मुल्लाजी आदी मान्यवर  उपस्थित होते.  या कार्यक्रमात प्रमुख अतिथिंसह गुणवंत विद्यार्थांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात  शरीफ मलिक यांनी कुरान पठण करून शाळेची अल्पावधीत झालेली प्रगती भविष्यातील ध्येय धोरणे व नियोजन आदींबाबत विस्तृत माहिती दिली. यावेळी आमोदे शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव  प्रा. उमाकांत पाटील सर, केंद्र प्रमुख गुलाम गॉस खान सर यांनी मनोगतात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जमाती इस्लामी हिंद चे अध्यक्ष  अब्दुल रऊफ जनाब यांनी अध्यक्षीय भाषणात  खाजगी शाळा चालविताना येणाऱ्या अडचणी, भविष्यातील त्यांची वाटचाल, शासन स्तरावरून सहकार्य यासह समाज बांधवांनी  एकजूट होऊन तन मन धनाने या शाळेला हातभार लावण्याचे आवाहन केले. व सर्वांना शुभेच्छा दिल्या.   कार्यक्रमाचे सूत्र संचालन साजीद सर, व जावेद सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रिन्सिपल शबनम खान मॅडम, नईम सर, शेख रशीद सर,  जुबेर सर, सुमैय्या खान मॅडम, इरम मॅडम, सुरैया मॅडम, आकिब सर, अब्दुल बासिद सर, यांनी सहकार्य केले तर मान्यवरांचे आभार उमर फारुक सर यांनी मानले.

No comments