शिरागड येथे जि.प. शाळेत विविध कार्यक्रम भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) यावलः आषाढी एकादशी निमीत्त शिरागड येथील जि...
शिरागड येथे जि.प. शाळेत विविध कार्यक्रम
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
यावलः आषाढी एकादशी निमीत्त शिरागड येथील जि.प . शाळेत वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते आषाढी एकादशी निमीत्त वारकरी दिंडी मोठ्या उत्साहात गावातून काढण्यात आली. यावेळी सरपंच सौ योगीता प्रतापराव सोनवणे, ग्राम पंचायत सदस्य प्रतापराव सोनवणे यांचे हस्ते श्री विठठल रुखमाई मातेचे प्रतमीचे पुजन करण्यात आले ग्रा प सदस्य रामकृष्ण तुळशीराम सोळके , उपसरपंच सौ मायाबाई ज्ञानेश्वर धिवर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोपन रामकृष्ण सोळके, उपध्यक्ष सौ कविता रविंद्र सोळके सह नागरीक गावकरी पालक उपस्थित होते .
टाळ मृदगाच्या जयहरी जयघोषात गावातून पालखी सोहळा काढण्यात आला सोहळ्याचे सुत्रसंचलन सचिन पाटील सरानी केले व आभार महेंद्र महाजन सर यांनी मानले

No comments