छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर..! चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा तालुक्यातील हातेड बुद्रुक येथे दिनांक.०...
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर..!
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील हातेड बुद्रुक येथे दिनांक.०५ जून २०२५ स्थळ- राजर्षी शाहू महाराज मंगल कार्यालय हातेड बुद्रुक या ठिकाणी राज्य शासनाच्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” अंतर्गत चोपडा तालुक्यातील सर्व गावांना एकत्रित महसूल व सर्वसमावेशक शासकीय सेवा शिबीराचे आयोजन करण्यात आले.उद्घाटन आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधून विविध योजनेचे लाभ व धनादेश प्रदान केले.
नागरिक सहभाग व लाभ- शिबिरात १३०० ते १४०० नागरिकांनी उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घेतला.शासनाच्या विविध विभागांनी एकत्रितपणे सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच प्रशासनाची सुविधा सुलभतेने मिळाली.
यावेळी उपस्थित मान्यवर नरेंद्र पाटील सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती चोपडा,एम.व्ही पाटील माजी उपसभापती पंचायत समिती,विकास पाटील माजी उपनगराध्यक्ष चोपडा,रावसाहेब पाटील,किरण देवराज,विकी सनेर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती चोपडा वसंत आप्पा बाविस्कर प्रकाश दादा रजाळे,प्रेरणा सोनवणे सरपंच हातेड बुद्रुक,रामकृष्ण सनेर,उपसरपंच,शांताराम बाविस्कर,शितल देवराज,
अधिकारी- तहसीलदार चोपडा भाऊसाहेब थोरात,अनिल भवारी पोलीस निरीक्षक चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन,गटविकास अधिकारी अनिल विसावे,विरेंद्र राजपूत सार्वजनिक बांधकाम विभाग,तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.प्रदिप लासुरकर,योगेश पाटील निवासी नायब तहसीलदार चोपडा महावितरणचे अभियंता,ग्रामीण पाणीपुरवठा,सर्व तालुका स्तरीय अधिकारी,कर्मचारी व मंडळ स्तरावरील यंत्रणा उपस्थित होते.
कार्यक्रम संचालन व समारोप- सूत्रसंचालन रमाकांत धनगर आणि स्वप्नील कुलकर्णी यांनी केले.
विशेष नोंद- या शिबिरामुळे नागरिकांना गावातच शासनाच्या विविध सेवा मिळाल्याने प्रशासनाविषयी समाधान व सकारात्मक भावना व्यक्त करण्यात आली.


No comments