adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल शेळगाव जळगाव मार्गे पुला वरून रूग्ण असलेली रुग्णवाहिका सोडली जाईल ; नितिन सोनार यांच्या मागणीला यश

 यावल शेळगाव जळगाव मार्गे पुला वरून रूग्ण असलेली रुग्णवाहिका सोडली जाईल ; नितिन सोनार यांच्या मागणीला यश   भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपा...

 यावल शेळगाव जळगाव मार्गे पुला वरून रूग्ण असलेली रुग्णवाहिका सोडली जाईल ; नितिन सोनार यांच्या मागणीला यश 



 भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

  यावल ते जळगाव शहराला अल्पवेळेत जोडणाऱ्या शेळगाव बॅरेजच्या  मार्गावरील पुलावरून रूग्ण असलेल्या रुग्णवाहीकेला सोडण्यात यावे या जनहिताच्या दृष्टीने मागणी शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार यांनी केलेली मागणीला यश मिळाले आहे . 

   या संदर्भात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता भुषण अहिरे यांना या मागणी संदर्भातील दिलेल्या निवेदनात म्हटले होते की,मागील अनेक वर्षापासून यावल तालुक्यातील विविध गावातुन सर्पदंश झालेले, विष प्राशन केलेले किंवा अपघातात गंभीर जखमी झालेले रूग्ण यांना पुढील उपचारासाठी रूग्णवाहीकेच्या माध्यमातुन जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात घेवुन जावे लागते, दरम्यान यावल ते भुसावळ मार्ग जळगाव असो किंवा यावल ते विदगाव मार्ग जळगाव असो या मार्गाने रूग्णवाहीका या रुग्णांना घेवुन जात असते,अशा प्रसंगी  जळगाव जाणारे दोघ ही मार्ग हे एक ते दिड तासांचा वेळ घेणारी असुन, अशा प्रसंगी रूग्ण वाहिका ही वेळेवर  पहोचत नसल्या कारणांने रूग्णांचे वेळेवर उपचार होत नसल्याने अनेक रूग्णांचा वाटेतच जिव गेलेला आहे किंवा जातो .                         दरम्यान नितिन सोनार यांनी पाटबंधारे विभागाचे अभियंता अहिरे यांची भेट घेवुन शेळगाव बॅरेज वरील पुलावरून किमान रुग्णवाहीका जाण्याची परवानगी मिळाल्यास अनेकांचे जिव वाचतील अशी माहिती देवुन रूग्णवाहीका सोडण्याची निवेदनाव्दारे विनंती केली असुन, या विनंतीला प्रतिसाद देत पाटबंधारे विभागाच्या वतीने शाखा अभियंता भुषण अहिरे यांनी जनहिताच्या दृष्टीने यावल ते जळगाव शेळगाव बॅरेजच्या पुलावरून रुग्णवाहीका सोडण्यात येतील अशी सुचना संबधीतांना देण्यात आल्याचे मान्य केले आहे .

No comments