वर्डी वि सो. चेअरमनपदी दीपक पाटील यांची निवड प्रतिनिधी रविंद्र कोळी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) वर्डी, ता. चोपडा : येथील विविध कार्यकारी ...
वर्डी वि सो. चेअरमनपदी दीपक पाटील यांची निवड
प्रतिनिधी रविंद्र कोळी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
वर्डी, ता. चोपडा : येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमनपदी नुकतीच दीपक पाटील यांची निवड करण्यात आली आहे. गजानन विश्वासराव पाटील यांनी मौखिक करारानुसार ठरल्याप्रमाणे आपल्या चेअरमन पदाचा राजीनामा दिला होता. या रिक्त पदासाठी २८ जुलैला निवडणूक घेण्यात आली. यात चेअरमन पदासाठी दीपक चंपालाल पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने
निवडणूक निर्णय अधिकारी भूषण बारी यांनी त्यांची बिनविरोध निवड घोषीत केली. चेअरमन दीपक पाटील यांना सूचक प्रदिप पाटील तर अनुमोदन रवींद्र धनगर यांचे मिळाले. या वेळी सदस्य आधार साळुंखे, धर्मराज पाटील, प्रवीण पाटील, राजेंद्र नायदे, मुनाफ पिंजारी, हिरामण पाटील, भगवान नायदे, शांताराम पाटील उपस्थित होते.व तसेच बाळासाहेब कांतीलाल काका विनायक नाना यानी अभिनंदन केले निवडणुकीसाठी सचिव विनोद पाटील, लिपिक सदानंद पाटील, अमोल पाटील सहकार्य केले.
No comments