adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पुणे शहरांत सिक्युरिटी ही महत्त्वांची बाब, सुरक्षारक्षकांची नेमणुका करा :- विधान परिषद उपसभापती डॉ .निलिमा गोऱ्हे..!!

 पुणे शहरांत सिक्युरिटी ही महत्त्वांची बाब, सुरक्षारक्षकांची नेमणुका करा :- विधान परिषद उपसभापती डॉ .निलिमा गोऱ्हे..!! सौ. कलावती गवळी ( पुण...

 पुणे शहरांत सिक्युरिटी ही महत्त्वांची बाब, सुरक्षारक्षकांची नेमणुका करा :- विधान परिषद उपसभापती डॉ .निलिमा गोऱ्हे..!!


सौ. कलावती गवळी ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 शिक्षण संस्कृतीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरांत महिला मुलींवर अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस होणारी वाढ ही चिंताजनक आहे, राज्याला काळजी करायला लावणारा हा प्रकार आहे, पुणे शहरांत कोंढवा येथील उच्चभू आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या गेटेड सोसायटीत एका 25 वर्षीय महिलेवर झालेल्या बलात्कारांच्या अमानुष घटनेनंतर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलिमा गोऱ्हे यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तांकडे तत्काळ आणि प्रभावी कारवाईची मागणी केली आहे, या घटनेनंतर शहरांतील महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे, त्यामुळे पुणे शहरांतील प्रत्येक परिसरांतील  सोसायटी कॉलेज महाविद्यालय शिक्षण संस्था अशा ठिकाणी सुरक्षा रक्षकांच्या नेमणुका करा असेही डॉ. नीलिमा गोऱ्हे यांनी स्पष्ट केले आहे. आपल्या परिसरांतील किंवा संस्थेची सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी सुरक्षा रक्षकांची गरज आहे जर तुम्हांला सुरक्षारक्षक नेमणूक करायचे असतील तर सुरक्षा एजन्सीकडे मागणी करा आणि आपला परिसर हा सुरक्षित राहील याची सर्वांनी काळजी घ्या असेही विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलिमा गोऱ्हे यांनी कोंढव्यातील झालेल्या घटनेच्या अनुषंगाने त्यांनी आपली पत्रकार परिषद दिली आहे

No comments