adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आषाढी एकादशीचा सोहळा शाळेत उत्साहात संपन्न फर्स्ट स्टेप प्री प्रायमरी स्कूल एरंडोल येथे आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांचा उत्साह

  आषाढी एकादशीचा सोहळा शाळेत उत्साहात संपन्न फर्स्ट स्टेप प्री प्रायमरी स्कूल एरंडोल येथे आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांचा उत्साह जळगाव ज...

 आषाढी एकादशीचा सोहळा शाळेत उत्साहात संपन्न

फर्स्ट स्टेप प्री प्रायमरी स्कूल एरंडोल येथे आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांचा उत्साह



जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

एरंडोल  :- आषाढी एकादशी हा भगवान श्री विठ्ठलाचा शुभ दिवस असून, या दिवशीचा शाळेतील कार्यक्रम फर्स्ट स्टेप  प्री प्रायमरी स्कूल एरंडोल येथे उत्साहात साजरा करण्यात आला. आषाढी एकादशी, ज्याला देवशयनी एकादशी असेही म्हणतात, हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा दिवस असून या दिवशी विष्णू योगनिद्रेत जातात, अशी श्रद्धा आहे.शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून 'ज्ञानोबा-माउली-तुकारामा' च्या गजरात दिंडी काढली. या दिंडीमुळे परिसर भक्तिमय झाला होता. विद्यार्थ्यांनी विविध नृत्य, नाटक आणि गाण्यांच्या माध्यमातून आषाढी एकादशीचे महत्त्व, भक्तीभाव आणि संतांची शिकवण सादर केली. 

 विद्यार्थ्यांनी भजनांद्वारे भगवान विष्णूची स्तुती केली आणि कीर्तनातून भक्तीचा आनंद घेतला. आषाढी एकादशीचे महत्त्व स्पष्ट करताना उपवासाचे आणि त्यातील पदार्थांचे महत्त्व सांगितले 

या निमित्ताने मुलांना आपल्या परंपरेचे, सामाजिक समतेचे आणि संतांच्या महानतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. आध्यात्मिक प्रगती आणि आत्मचिंतनासाठी या दिवसाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. शैक्षणिक वातावरणात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे, हा या कार्यक्रमाचा एक उद्देश होता. 

फर्स्ट स्टेप प्री प्रायमरी स्कूल मध्ये आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी परंपरा आणि संस्कृतीचे महत्त्व अनुभवले. दिनांक 5 जुलै 2025 वार शनिवार रोजी सकाळी 9 ते 12 च्या वेळेत संपन्न झाला झाला

कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक श्रीमती नूतन पाटील मॅडम श्रीमती अश्विनी वाल्डे. श्रीमती गायत्री सुतार श्रीमती प्रिया पाटील श्रीमती धनश्री पाटील शिक्षकेतर कर्मचारी रूपाली पाटील लुभान पाटील उपस्थित होते शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.

No comments