तोफखाना पोलिसांची धडक कारवाई..स्विफ्ट गाडीत सुगंधी तंबाखू गुटखा हस्तगत.. सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर (दि...
तोफखाना पोलिसांची धडक कारवाई..स्विफ्ट गाडीत सुगंधी तंबाखू गुटखा हस्तगत..
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि२२):-महाराष्ट्र राज्यामध्ये गुटखा,पानमसाला,सुंगधीत तबाखु,मावा,खर्रा व तस्मत अन्न पदार्थाच्या विक्री,साठा,उत्पादन वाहतुकीस बंदी घातलेली आहे. सदर अन्नपदार्थ मानवी आरोग्यास हानीकारक आहेत. तसेच त्याच्या सेवनापासुन वेगवेगळ्या प्रकाराचे आजार उद्भवतात.त्यामुळे शरीरास बाधा व हानी पोहचत असते. त्यातच
दि.22 जुलै 2025 रोजी तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आंनद कोकरे यांना बातमी मिळाली की,न्यु प्रेमदान हाडको,सावेडी येथे एक इसम पांढ-या रंगाची स्विफ्ट कारमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली सुगंधी तंबाथु व गुटखा विक्री करणाचे उद्देशाने स्वातःचे कब्जात बाळगुन आहे.अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक श्री.आनंद कोकरे यांनी गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी सापळा लावून कारवाई करण्यास सांगितली असता बातमीतील नमुद ठिकाणी पथक गेले असता पथकास एक स्विफ्ट कार दिसुन आली. त्यानंतर सदर ठिकाणी पथकाने छापा टाकुन आरोपी नामे अनिकेत पोपट दळवी (वय 25 वर्षे,रा.न्यु प्रेमदान हाडको, सावेडी,ता.जि.अहिल्यानगर) यास ताबत घेवुन त्याचे मालकीचे सदर स्विफ्ट कारची दोन पंचासमक्ष पाहाणी केली असता त्यामध्ये केसर युक्त विमल पान मसाल्याच्या 13 गोण्या प्रत्येक गोणीमध्ये 22 पुडे,प्रत्येक पुड्यात 11 पाऊच, V-1 तम्बाकु असे इंग्रजीमध्ये नाव असलेले 12 पाकिटे,प्रत्येक पाकीटामध्ये 22 पाऊच व नमुद स्विफ्ट कार असा एकुण 5,12,436/-रु.किं.चा मुद्देमाल मिळुन आल्याने सदरचा मुद्देमाल व स्विफ्ट कार जप्त करण्यात आली आहे.सदर अन्न पदार्थ मानवी आरोग्यास हानीकारक आहेत. तसेच त्याच्या सेवानापासुन वेगवेगळ्या प्रकाराचे आजार उद्भवतात. त्यामुळे शरीरास बाधा हानी पोहचते.याबाबत सदर इसमास ज्ञात असुन देखील वरील आरोपी याने स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी प्रतिबंधीत अन्न पदार्थाचा साठा करुन महाराष्ट्र शासन यांची अधिसुचना असुमाका/अधिसुचना/411/2025/7 दिनांक.16/07/2025 चे उल्लंघन केले असल्याचे आढळुन आल्याने त्याचे विरुद्ध पो.कॉ 2335 कपिल श्रीराम गायकवाड यांनी तोफखाना पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस स्टेशन अहिल्यानगर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123, 274, 275,223 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग श्री.अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखालील पो.नि श्री.आनंद कोकरे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर,पो.हे.कॉ अब्दुलकादर इनामदार,पो.हे.कॉ बापुसाहेब गोरे,पो.हे.कॉ.सुधिर खाडे,पो.हे.कॉ.सुरज वाबळे, पो.कॉ सुजय हिवाळे,पो.कॉ. सतिष त्रिभुवन,पो.कॉ. बाळासाहेब भापसे,पो.कॉ.कपिल गायकवाड यांनी केली आहे
No comments