adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दुसखेडा जि.प.प्राथमिक शाळा येथे समग्र शिक्षा अभियान अंतर्गत गणवेश वाटप ! पोलीस पाटील सौ.संगिता दांडगे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वाटप.

 दुसखेडा जि.प.प्राथमिक शाळा येथे समग्र शिक्षा अभियान अंतर्गत गणवेश वाटप ! पोलीस पाटील सौ.संगिता दांडगे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश व...

 दुसखेडा जि.प.प्राथमिक शाळा येथे समग्र शिक्षा अभियान अंतर्गत गणवेश वाटप !

पोलीस पाटील सौ.संगिता दांडगे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वाटप. 


भरत कोळी यावल ता.प्र.

(संपादक-:- हेमकांत गायकवाड)

 यावल : दुसखेडा येथील जि.प.प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियान अंतर्गत पोलिस पाटील सौ.संगिता विशाल दांडगे यांचे हस्ते शालेय गणवेश व शूज तसेच पायमोजे वाटप करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन दुसखेडा गावच्या सरपंच सौ.लक्ष्मीताई सोनवणे या उपस्थित होत्या. व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल सोनवणे उपस्थित होते. या वेळी पालक वर्ग अश्वीनी सोनवणे, सुषमा तायडे,पुनम सोनवणे,काजल सोनवणे,निंबाबाई सोनवणे, उज्वला तायडे,इंदूबाई सोनवणे विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक विनोद तायडे सर यांनी केले तर आभार उपशिक्षक प्रशांत पाटील, नितिन चौधरी, यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी प्रियंका सोनवणे यांचे सहकार्य लाभले.

No comments