आसेमं ची जागतिक आदिवासी दिनानिमित्त आढावा बैठक संपन्न एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयसह विविध विषय ,प्रश्नांवर चर्चा रावेर प्रति...
आसेमं ची जागतिक आदिवासी दिनानिमित्त आढावा बैठक संपन्न
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयसह विविध विषय ,प्रश्नांवर चर्चा
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आसेमं आदिवासी सेवा मंडळ ची सावदा येथील शासकीय विश्रामगृह (रेस्ट हाऊस) येथे दि १३ जुलै रोजी आढावा बैठक पार पडली या बैठकीत विविध विषयांवर मान्यवरांच्या उपस्थितीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली प्रथमता आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय येथे आदिवासी साठी असलेल्या शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी याकरीता यावल प्रकल्प अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली तसेच जागतिक आदिवासी आदिवासी दिन आदिवासी गावागावात तसेच तालुका ठिकाणी उत्साहाने साजरा करण्यासाठी नियोजन केले जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी प्रकल्प कार्यालयातर्फे आदिवासी दिनाचा कार्यक्रम हा फक्त आदिवासी प्रकल्प कार्यालयात साजरा न करता त्या ऐवजी जिल्ह्यातील आदिवासीबहुल भागात तो तालुकास्तरावर फिरत्या रोटेशनने साजरा करण्यात यावं या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली
यावेळी आसेमं आदिवासी सेवा मंडळ चे संस्थापक अध्यक्ष राजू बिर्हाम तडवी जिल्हाध्यक्ष मुबारक (राजू ) अलीखां तडवी कर्मचारी महासंघाचे इरफान तडवी सर राजु इब्राहिम तडवी साहेब हनिफ तडवी साहेब राजू मुशिर अनिल नजीर तडवी मुबारक गुरुजी नवाज तडवी मुसा तडवी अशरफ तडवी अप्पा अफजल तडवी युवा जिल्हाध्यक्ष बिराज तडवी असलम सलीम तडवी अलाउद्दीन तडवी समशेर तडवी जमशेर तडवी न्याजोदिन तडवी युसुफ तडवी मोहसीन तडवी यांच्यासह पाचोरा येथील आसेमं चे नवनिर्वाचित पदाधिकारी कार्यकर्ते मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते
यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल प्रकल्प अधिकारी यांना भेटून कार्यालय संबंधित खालील विषयांवर चर्चा व मागण्यांबाबत निवेदन सादर केले जाईल
1) आदिवासी बांधवांना स्वतंत्र आदिवासी धर्म कोड लागु करावा.
2) जागतिक आदिवासी दिनानिमित्त सार्वजनिक सुटीची मागणी करावी
3) आदिवासी करीता असलेला निधी संपूर्ण आदिवासी योजनांवरच खर्च व्हावा.
4) न्युक्लिअस बजेट अंतर्गत योजना फार्म वारंवार मागवू नये. तसेच योजना प्रभावीपणे राबवावी
5) शबरी घरकुल योजना ही प्रभावी पणे राबवावी.
6) आदिवासी विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सव शिष्यवृत्तीत वाढ करुन ती दुप्पट करून विहीत वेळेत वाटप करण्यात यावी व दारिद्रय रेषा, पिवळे कार्ड असलेल्यांना उत्पन्नाचा दाखला ही अट रद्द करावी
7) शबरी महामंडळ तर्फे आदिवासी बांधवांना खावटी कर्ज वाटप योजना राबविण्यात यावी
8) आदिवासी शेतकरी बांधवांसाठी शेती पुरक व उपयुक्त योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी
9) डि.बी.टी अर्थ सहाय्य विद्यार्थ्यांना वेळेत मिळावे.
10) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय च्या प्रांगणात आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा,तंट्या मामा भिल यांचे पुतळे उभारण्यात यावेत
11) रावेर तालुका ठिकाणी अथवा फैजपूर आदिवासी बांधवांसाठी उपयुक्त सर्व सोयीसुविधा युक्त आदिवासी भवन बांधण्यात यावे
आयत्या वेळी येणारे मुद्द्यावर चर्चा करण्यात आली
No comments