भूसावळ शहरातील सिंधी कॉलनी, नानक नगर, नवजीवन सोसायटी ह्या परिसरातील घरांचे अस्तित्वात असलेल्या बांधिव क्षेत्रफळाचे मोजमाप करून कर वसुली करण्...
भूसावळ शहरातील सिंधी कॉलनी, नानक नगर, नवजीवन सोसायटी ह्या परिसरातील घरांचे अस्तित्वात असलेल्या बांधिव क्षेत्रफळाचे मोजमाप करून कर वसुली करण्याची मागणी
भुसावळ प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भूसावळ शहरातील सिंधी कॉलनी, नानक नगर, नवजीवन सोसायटी ह्या परिसरातील घरांची बांधकाम परवानगी, घरपट्टी टॅक्स पावती नुसार अस्तित्वात असलेल्या बांधिव क्षेत्रफळाचे मोजमाप करून कर वसुली करण्यात यावी तसेच ह्या परिसरात व्यापार करण्यासाठी उभारन्यात आलेल्या दुकानाचे शॉप ऍक्ट परवाना फेर तपासणी करून योग्य ते कर आकारण्यात येऊन शासनास वसुली करून द्यावी व अतिक्रमन असल्यास बांधकाम विभागास आदेश देऊन पुढील कार्यवाही करावी अशा मांगणीचे निवेदन स्वराज्य माहिती अधिकार संघटना भुसावळ तालुका अध्यक्ष श्री. मिलिंद सोनवणे यांनी मुख्याधिकारी नगर परिषद भुसावळ याना निवेदन देऊन केली आहे.
No comments