आळंदी हादरली, वारकरी शिक्षण संस्थेत तरूणीवर लैंगिक अत्याचाराची तक्रार ! एका महिलेसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल..!! संभाजी पुरीगोसावी ( प...
आळंदी हादरली, वारकरी शिक्षण संस्थेत तरूणीवर लैंगिक अत्याचाराची तक्रार ! एका महिलेसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल..!!
संभाजी पुरीगोसावी ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पूणे, 12 जुलै: पुणे जिल्ह्यातील आळंदी परिसरांतील केळगाव आध्यात्मिक क्षेत्रात काळीमा फासणारी घटना समोर आली आहे, आळंदी येथील एका मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेत एका युवतीवर अपहरण करून लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून पाच जणांविरुद्ध बलात्कार, अपहरण, धमकी आणि गुन्हेगारी कट रचणे यासारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२ जून २०२५ रोजी संध्याकाळी पीडित युवती घरी एकटी असताना, परिचित जनाबाई आंधळे यांनी तिला शेतात चल असे म्हणत बाहेर नेले. वाटेत MH 43 CC 7812 क्रमांकाच्या काळ्या इर्टिगा गाडीत आण्णासाहेब, प्रविण आंधळे आणि एक अनोळखी चालकाने जबरदस्तीने तिला गाडीत बसवून ऍसिड फेकण्याची धमकी दिली.
आळंदी येथे झाला अत्याचार
तिला जबरदस्तीने आळंदीतील केळगाव परिसरात नेण्यात आले. तिथे आण्णासाहेब आंधळे, प्रविण आंधळे, सुनिता आंधळे, अभिमन्यु आंधळे यांनी तिला एका खोलीत डांबून ठेवले. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, आण्णासाहेब आंधळे यांनी तिच्यावर अत्याचार केला.
पीडित युवतीने प्रसंगावधान राखत 112 वर संपर्क साधून मदत मागितली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन तरुणीची सुटका केली आणि संबंधित व्यक्तींना आळंदी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.
सुरुवातीला घाबरून पीडित युवतीने तक्रार दिली नव्हती. मात्र नातेवाइकांना सांगितल्यानंतर ७ जुलै रोजी शेवगांव पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली. गुन्हेगारी कलमे:
IPC कलम 376 (बलात्कार), 366 (अपहरण), 506 (धमकी), 120B (कट कारस्थान) या कलमा अंतर्गत अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींची नावे:
आण्णासाहेब प्रल्हाद आंधळे
प्रविण प्रल्हाद आंधळे
अज्ञात चालक
सुनिता अभिमन्यु आंधळे
अभिमन्यु भगवान आंधळे
पैसे व सोन्याचा वापर करून तडजोडीचा प्रयत्न?
या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे, आरोपींच्या भावाकडून १० लाख रुपये व १० तोळे सोने घेऊन तडजोडीचा प्रयत्न झाल्याची माहिती पीडितेच्या नातेवाईकांनी दिली आहे. आरोपी व संस्थेचे लोक मिळून मुलीला एका खोलीत डांबून ठेवून “लग्न लावून देतो, प्रकरण मिटवू” असे म्हणत २ लाखांत सौदा करण्याचा प्रयत्न केला होता.
संस्थेविरुद्ध गंभीर आरोप: ही संस्था वारकरी शिक्षण संस्था असून, या आधीही महिला आयोगाच्या उपस्थितीत इतर तक्रारी समोर आल्या आहेत. मुलींवर मानसिक दबाव, आर्थिक प्रलोभन, बदनामी व धमक्यांचा प्रकार पूर्वीही घडला असल्याची माहिती स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांकडून मिळते आहे.
No comments