तथागतांचे व बाबासाहेबांचे विचार समाजापर्यंत पोहोचविणे काळाची गरज.. -:-प्रेमनाथ कांबळे लातूर,दि.१२( उत्तम माने) (संपादक -:- हेमकांत गायकव...
तथागतांचे व बाबासाहेबांचे विचार समाजापर्यंत पोहोचविणे काळाची गरज.. -:-प्रेमनाथ कांबळे
लातूर,दि.१२( उत्तम माने)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची जगाला अत्यंत गरज आहे. तथागतांनी त्यांच्या शिष्यांना केलेला उपदेश मानवाला अत्यंत उपयुक्त आहे. पावसाळ्याच्या काळामध्ये भिक्खूगण समाज प्रबोधनाचे व तथागतांचे विचार पोचवण्याचे कार्य विहारात थांबून करत असत.पावसामुळे त्यांना भ्रमंती करणे शक्य होत नव्हते असे प्रतिपादन प्रेमानाथ कांबळे यांनी केले..
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा, लातूर यांनी आयोजित केलेल्या वर्षावासानिमित्त धम्म प्रवचन मालिका वर्षावास कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा सरचिटणीस अभिमन्यू लामतूरे यांच्या हस्ते झाले.
यावेळी राहुल गायकवाड यांनी बौद्ध धम्मामध्ये आषाढी पौर्णिमेला अन्यसाधारण महत्त्व आहे हे सांगून बौद्धांनी वर्षावास काळात उपासक व उपासिकांनी उपोसथ व्रताचे काटेकोरपणे पालन करुन पुण्य अर्जित करावे, असे आवाहन केले.
आषाढी पौर्णिमेला भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये वेगवेगळे प्रसंग घडले याचे उपस्थित उपासक - उपासिका यांना सविस्तर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप संस्कार विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष आयु. गौतम बनसोडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वरीताई बटवाड यांनी केले.
या कार्यक्रमाला माजी जिल्हाध्यक्ष हिराचंद गायकवाड, प्रचार व पर्यटन विभाग जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र क्षिरसागर, सचिव आनंद डोणेराव व लक्ष्मण कांबळे, महिला शाखेचे सरचिटणीस वंदनाताई कांबळे, मायाताई कांबळे, सुरेखाताई भालेराव, राहुल जाधव, रुपेश गायकवाड,अँड. पप्पू अवचारे, प्रा. डॉ. जितेंद्र गायकवाड, तक्षशिला महिला मंडळाचे अध्यक्ष कलुबाई डुमणे, सोरटेताई व सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जिल्हा संघटक आयु. विलास आल्टे यांनी केले आयु.दत्तात्रय भोसले यांनी आभार मानले.कार्यक्रमाची सांगता सरणत्तयने झाली..
No comments