वैजापूर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत देवझिरी येथे लसीकरण सत्रादरम्यान जनजागृती उपक्रम चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) देवझ...
वैजापूर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत देवझिरी येथे लसीकरण सत्रादरम्यान जनजागृती उपक्रम
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
देवझिरी,दि.४ जुलै २०२५ : वैजापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत आज देवझिरी गावात गर्भवती महिलांसाठी जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
गर्भवती मातांशी संवाद साधून गर्भसंस्कार,पोषण,मातृ व बाल आरोग्य याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे सापशिडीच्या खेळाच्या माध्यमातून आरोग्यविषयक संदेश पोहोचविणे.या उपक्रमामुळे उपस्थित महिलांना आरोग्याची काळजी कशी घ्यावी,हे सोप्या भाषेत समजावून सांगण्यात आले.यावेळी आपले आधार संस्था प्रकल्प व्यवस्थापक दीपक संदाशीव,सागर पावरा,निशांत कोळी,प्रीती बारेला,शिवा बारेला,ज्ञानेश्वर सोनवणे,लेनिन महाजन तसेच गटप्रवर्तक,महिला,आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



No comments