adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अवैध तिरट जुगार अड्ड्यावर कोतवाली पोलिसांचा छापा..नऊ जणांवर गुन्हा दाखल

  अवैध तिरट जुगार अड्ड्यावर कोतवाली पोलिसांचा छापा..नऊ जणांवर गुन्हा दाखल  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर (दि...

 अवैध तिरट जुगार अड्ड्यावर कोतवाली पोलिसांचा छापा..नऊ जणांवर गुन्हा दाखल 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.५):-केडगाव येथील जुगार अड्यावर कोतवाली  पोलिसांनी छापा टाकून तिरट जुगाराच्या साहित्यासह एकूण 6,07,490/-रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.दि.04 जुलै 2025 रोजी सायंकाळच्या सुमारास कोतवाली पोलीस निरीक्षक श्री.प्रताप दराडे  यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,शेटे मळा, निंबोळीचे झाडाखाली,डांबरी रस्त्यावर,लिंकरोड,केडगाव येथे काही इसम तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळत व खेळवित असुन आत्ता गेल्यास मिळुन येईल अशी अशी माहीती मिळाल्याने पोनी.दराडे यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाचे पोसई/कृष्णकुमार सेदवाड यांना पोलीस स्टाफ व पंचासह बातमीतील नमुद ठिकाणी जावून कारवाई करणेबाबत आदेशीत केले असता शेटे मळा,निंबोळीचे झाडाखाली,डांबरी रोडवर, लिंकोड, केडगाव, अहिल्यानगर येथे सायंकाळी छापा टाकुन कारवाई केली.पोलीसांनी पंचासमक्ष कारवाईत तिरट नावाचे जुगाराचे साहित्य,रोख रक्कम,08 मोबाईल फोन, 01 चारचाकी अल्टो गाडी व 06 मोटारसायकल असा एकूण 6,07,490/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन ताब्यात घेतला असुन आरोपी नामे 1) अक्षय सुनिल गोरे, वय-33 वर्षे, रा. दत्तचौक, भुषणनगर, केडगाव, अहिल्यानगर, 2) अमन बाबु शेख, वय-24 वर्षे, रा. भुषणनगर, केडगाव, अहिल्यानगर, 3) मयुर देविदास गहिले, वय-30 वर्षे, रा.दुधसागर सोसायटी, केडगाव, अहिल्यानगर, 4) प्रतिक अनिल महारपुडे, वय-26 वर्षे, रा.सोनेवाडी, लोंढेमळा, केडगाव, अहिल्यानगर, 5) ज्ञानेश्वर रामचंद्र जाधव, वय-43 वर्षे, रा. शिवाजी नगर, प्लटों नं.06, केडगाव, अहिल्यानगर, 6) गणेश सुरेश शेळके, वय-39 वर्षे, रा. भुषणनगर, केडगाव, अहिल्यानगर, 7) ज्ञानेश्वर भगनान मिसाळ, वय-35 वर्षे, रा. जयशंकरनगर, केडगाव, अहिल्यानगर, 8) बाबासाहेब नामदेव गायकवाड, वय 58 वर्षे, रा. भुषणनगर, झेंडाचौक, केडगाव, अहिल्यानगर, 9) प्रविण बापुसाहेब सातपुते, वय-32 वर्षे, रा.भुषणनगर, केडगाव,अहिल्यानगर यांचेविरुध्द पोकॉ.महेश सुभाष पवार यांचे फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशनला गु.र.नं. 621/2025 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोसई/कृष्णकुमार सेदवाड हे करीत आहे.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री.सोनमाथ घार्गे,अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग श्री.अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.प्रताप दराडे, गुन्हे शोध पथकाचे पोसई/कृष्णकुमार सेदवाड, पोहेकॉ/बाळकृष्ण दौंड, विशाल दळवी, सलीम शेख, विनोद बोरगे, विक्रम वाघमारे, सुर्यकांत डाके, पोकॉ/सत्यजीत शिंदे, अमोल गाडे, अतुल काजळे, सोमनाथ केकाण, महेश पवार, शिरीष तरटे, सचिन लोळगे, दत्तात्रय कोतकर, मपोकॉ.प्रतिभा नागरे, दक्षिण मोबाईल सेलचे पोकॉ.राहुल गुंडु यांचे पथकाने केली आहे.

No comments