रो.ह.योजनेच्या कामांची यादी ग्राम पंचायत मध्ये लावा : मागणी भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावलः महाराष्ट्र राज्...
रो.ह.योजनेच्या कामांची यादी ग्राम पंचायत मध्ये लावा : मागणी
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावलः महाराष्ट्र राज्य शासनाच्या महात्म गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून होत असलेल्या कामांची यादी व रोजगार हमी योजनेच्या जॉब कार्ड असलेल्या लाभार्थ्याची यादी ग्राम पंचायत मध्ये लावण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे
महाराष्ट्र शासन निर्णय नुसार महात्म गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत असून त्या कागदोपत्री राबविण्यात येतात तर काही वशीलेबाजीत येत असून रोजगार हमी आर्धी आम्ही अन, अर्धी तुम्ही असा अनुभव ग्रामीण भागातील ग्रामस्थाना येत आहे.
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेततळे, गुरांच्या गोठा, शाळेचे वॉलकपाउण्ड , कुशल अकुशल कामगाराचे वेतन, शबरी/ रमाई , प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभार्थ्यांना दिली जाणारी मजूरी, वृक्षरोपवन सह विविध प्रकारच्या अनेक योजना राबविल्या जातात असून त्या प्रत्यक्ष लाभार्थ्या पर्यत पोहचत नसल्यांची खंत ग्रामीण भागातील नागरीकांकडून होत आहे.
ग्राम पंचायतच्या माध्यमातून रोजगार सेवक मार्फत विविध प्रकारच्या अनेक ठिकाणी सुरू असलेला कामांचे मुल्यमापन जीओ टॅग फोटो काढून मस्टर काढण्यात येते व पंचायत समीती तुन लाभार्थ्याचे मस्टर काढून बिले मंजूर आधार लिंक असलेला खात्यावर वर्ग करण्यात येतात मात्र अनेक लाभार्थी मात्र या अनुदान पासून वंचित राहत असून लाभार्थ्यांच्या याद्या मंजूर कामांच्या याद्या व विविध प्रकारच्या योजना असलेले फलक दर्शनी भागात लावण्यात यावा अशी मागणी ग्रामीण भागातून करण्यात येत आहे
No comments