adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपड्यात रंगला तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल भक्तीमय सोहळा

  चोपड्यात रंगला तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल भक्तीमय सोहळा   चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा:--महाराष्ट्राचे लाडके उपमुख्...

 चोपड्यात रंगला तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल भक्तीमय सोहळा  



चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा:--महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ना अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल हा वारकरी परंपरेचा भक्तीमय गीतांचा कार्यक्रम नाट्यगृह येथे २५जुलै रोजी संध्याकाळी ६वाजेला आयोजित करण्यात आला होता.

    या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य  होते की परिवर्तन नाट्य संस्थेचे अध्यक्ष शंभू पाटील व त्यांची टीम सातासमुद्रापार या चमू ने भक्तीगीतांचा कार्यक्रम सादर केला असून अतिशय मंत्रमुग्ध करणारी भक्तिसंगीताची गाणी ते सादर करीत असतात.

     दरवर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील पाटील(वाळकी)हे अजितदादांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत असून यावर्षी ही अतिशय सुरेख कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री गुलाबराव देवकर,माजी आमदार दिलीपराव सोनवणे,रवींद्र पाटील(प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस)अरविंद चितोडीया,(युवक जिल्हाध्यक्ष)सोनाली नारायण पाटील(महिला जिल्हाध्यक्ष)युवती जिल्हाध्यक्ष भाग्यश्री ठाकरे, परेश देशमुख (उपजिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस) बाळासाहेब पाटील(तालुकाध्यक्ष)गिरीश देशमुख,(शहर अध्यक्ष)चंद्रकलाताई पाटील(सरपंच) यांच्या हस्ते पार पडले.

      यावेळी प्रमुख उपस्थिती नारायण पाटील(माजी अध्यक्ष कृउबा) योगेश देसले,ऍड.प्रदीप पाटील,राकेश सोनार,सविता पाटील,मायाताई महाजन, निलेश पाटील,मिलिंद सोनवणे, किरण करंदीकर, यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण पाटील यांनी तर प्रस्तावना सुनील पाटील यांनी केली.

No comments