माजी नगराध्यक्ष कै.नानासाहेब विष्णू हरी पाटील यांच्या जयंतीनिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप इदू पिंजारी फैजपूर (संपादक ...
माजी नगराध्यक्ष कै.नानासाहेब विष्णू हरी पाटील यांच्या जयंतीनिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आ. गं. हायस्कूल व ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालय, तसेच पीएमश्री नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्यामंदिर आणि पालक-शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने माजी नगराध्यक्ष व दानशूर व्यक्तिमत्व कै. नानासाहेब विष्णू हरी पाटील यांच्या जयंतीनिमित्त गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. लक्ष्मी विष्णू ट्रस्टच्या माध्यमातून कै. वसंतराव, कै. रविंद्र व कै. सुधीर विष्णू पाटील या दानशूर कुटुंबीयांनी एक लाख रुपयांची अनामत रक्कम दोन्ही शाळांमध्ये ठेवली आहे. या रकमेच्या व्याजातून दरवर्षी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात कै. नानासाहेब पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. शैक्षणिक साहित्याचे वाटप नानासाहेब पाटील यांचे नातू मनोज वसंतराव पाटील व नात सून वैशाली मनोजकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य पी.जी.भालेराव होते. प्राचार्य भालेराव यांनी आपल्या मनोगतात माजी नगराध्यक्ष कै. नानासाहेब पाटील यांच्या सामाजिक व शैक्षणिक योगदानाचे स्मरण करत दानशूर पाटील कुटुंबाचे आभार मानले.
No comments