फैजपूरच्या मिल्लत नगर भागातील फातेमा उर्दू गर्ल्स हायस्कूलच्या रस्त्याची दयनीय अवस्था इदू पिंजारी प्रतिनिधी फैजपूर (संपादक -:- हेमकांत ग...
फैजपूरच्या मिल्लत नगर भागातील फातेमा उर्दू गर्ल्स हायस्कूलच्या रस्त्याची दयनीय अवस्था
इदू पिंजारी प्रतिनिधी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथील फातिमा उर्दू गर्ल्स हायस्कूल व प्राथमिक शाळेचे जवळील रस्त्यावर जागो जागी पावसामुळे डबके साचलेले असून मुख्य अधिकारी यांना गेल्या महिन्यापूर्वी निवेदन सादर करण्यात आले होते मात्र मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांना दिलेल्या निवेदनवर त्यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याने किंवा दखल घेतली नसल्याचे शाळेने तीव्र संताप व्यक्त केले आहे. येथील मिलत नगर भागातील फातिमा उर्दू गर्ल हायस्कूल व प्राथमिक शाळा शेजारी शेजारी असून गेल्या २० वर्षापासून मुस्लिम विद्यार्थी विद्यार्थिनीं ची शाळा असून जवळ पास ३०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत
तरी पावसाच्या पाण्यामुळे शाळेच्या समोरील भागास पाण्याचे डबके साचलेले असून विद्यार्थी विद्यार्थिनींना खूप कसरत करावी लागत असून त्यांचा शैक्षणिक नुकसान होत असल्याचे दिसत आहे आज दिनांक ३० जुलै रोजी शाळा समोरील मोठ्या प्रमाणात रस्ता खराब झालेला असून त्यामुळे जागो जागी डबके साचलेले आहेत त्या मुळे शाळेला सुट्टी ही देण्यात आली होती गेल्या एक महिन्या पूर्वी नगरपालिकेला तक्रार देण्यात आले होते. तरी सुद्धा कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही तरी तात्काळ उपा योजना करून विद्यार्थी विद्यार्थिनींचे समस्या मार्गी लावण्यात यावे असे तक्रार नगरपालिकेला देण्यात आले आहे.
No comments