जगदीश मानवतकर यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश वाशीम प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) संविधान वाचविण्...
जगदीश मानवतकर यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश
वाशीम प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
संविधान वाचविण्याकरिता आणि मराठी भाषा संवर्धन करण्याकरिता श्री शिवसेना प्रमुख स्व .बाळासाहेब ठाकरे आणि श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन जगदीश मानवतकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षामध्ये प्रवेश केला .
स्थानिक वाशिम येथील समोर नवोदय विद्यालय समोर काटा चौफुली, शेळके कॉम्प्लेक्स ,पहिला माळा वाशिम येथील वाशिम यवतमाळ लोकसभेचे विद्यमान खासदार श्री. संजय भाऊ देशमुख यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री श्री अरविंद सावंत साहेब यांची उपस्थिती होती. मंचावर श्री.दिलीपराव जाधव साहेब शिवसेना संपर्कप्रमुख ,श्री. सुरेश मापारी साहेब जिल्हाप्रमुख वाशिम ,डॉ. सुधीर कव्हर साहेब सह संपर्कप्रमुख वाशिम जिल्हा, श्री .गजानन देशमुख जिल्हा संघटक वाशिम, डॉ .सिद्धार्थ देवळे साहेब जिल्हा समन्वयक वाशिम, कॅप्टन प्रशांत सुर्वे साहेब लोकसभा संघटक , श्री. राजेश पाटील राऊत साहेब , माजी जिल्हाप्रमुख सौ मंगलाताई सरनाईक महिला जिल्हा संघटिका ,श्री.नितीन मडके साहेब जिल्हा युवा सेना अधिकारी , जुबेर मोहन वाले जिल्हा युवा सेना अधिकारी, सौ. प्रिया महाजन युवती सेना जिल्हा अधिकारी , श्री बालाजी वानखडे श्री सुभाष बोरकर साहेब यांच्यासह सर्व शिवसेनेचे आजी आणि माजी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अरविंद साहेब यांनी शिवसेनेची मशाल वाशिम मधील प्रत्येक घरात पोचवा असा संदेश आपल्या भाषणातून दिला . यावेळी त्यांच्या समर्थक रवी ठोके, संजय संजय पुंडसे, गौतम कंकाल, प्रदीप खडसे, ॲडव.संतोष केस्वानी, अक्षय इंगोले, विशाल मुंढे, रामदास कालापाड यांच्यासह यांच्यासह बऱ्याच कार्यकर्त्यांनी या पक्षामध्ये प्रवेश केला. प्रवेशाकरिता शिवसेनेचे संतोष लांडकर, युवा सेनेचे आशिष भाऊ इंगोले, नानाभाऊ ,सुशील भीमजियानी यांचे विशेष सहकार्य लाभले. जगदीश मानवतकर हे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत आपल्या वक्तृत्वामुळे त्यांचे व्याख्यान आणि प्रबोधन चांगलेच गाजलेले आहेत. अनेक वर्षापासून वाशिम मध्ये सामाजिक कार्य जशी की रक्तदान शिबिर ,रोगनिदान शिबिर, मोर्चे आंदोलन उपोषण असे बरेच काही त्यांनी केले आहे . शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारेमध्ये ते बऱ्याच वर्षापासून कार्यरत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष प्रत्येक गावात आणि घरापर्यंत नेईल असा आशय जगदीश मानवतकर यांनी प्रसार माध्यमांना बोलून दाखवलेला आहे.
No comments