adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शिरवळ पोलिसांकडून चोरीस गेलेले लाखांचे स्मार्ट फोन हस्तगत..!! शिरवळ पोलिसांची दमदार कामगिरी !

  शिरवळ पोलिसांकडून चोरीस गेलेले लाखांचे स्मार्ट फोन हस्तगत..!! शिरवळ पोलिसांची दमदार कामगिरी !   सौ. कलावती गवळी ( सातारा जिल्हा ) प्रतिनिध...

 शिरवळ पोलिसांकडून चोरीस गेलेले लाखांचे स्मार्ट फोन हस्तगत..!! शिरवळ पोलिसांची दमदार कामगिरी !  


सौ. कलावती गवळी ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

हस्तगत शिरवळ पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये हरवलेल्या स्मार्ट मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी डी.बी पथकांने मोहीम राबवली सी.ई.आर पोर्टल व तांत्रिक माहिंतीच्या आधारे महाराष्ट्रांतील वेगवेगळ्या जिल्ह्यातून संपर्क साधून चिकाटीने मोहीम राबविल्याने गहाळ झालेले 1 लाख 8  हजारांचे स्मार्ट फोन मोबाईल फोन हस्तगत करण्यात शिरवळ पोलिसांना यश मिळेल आहे. शिरवळ पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा उघडकीस आणल्यानंतर तपासादरम्यान जप्त केलेले वेगवेगळ्या कंपनीचे एकुण 3 लाख 90 हजारांचे मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत. जप्त मोबाईल फोन परत मिळवण्यासाठी फिर्यादी मयूर शिंदे यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्याचप्रमाणे न्यायालयाने जप्त मोबाईल फिर्याद परत करण्याचे आदेश दिले आहेत. मुद्देमाल शुक्रवारी त्यांना परत करण्यात आला.

सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हरवलेले मोबाईल फोनचा शोध घेणेकामी शिरवळ पोलीस ठाणेचे डी.बी. पथकांस सुचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुशंगाने डी.बी. पथकांतील पोलीस स्टाफने सी.ई.आर. पोर्टल व तांत्रीक बाबीचे आधारे महाराष्ट्रांतुन वेगवेगळ्या जिल्हयातुन हस्तेपरहस्ते वारंवार संपर्क करुन चिकाटीने सदरची मोहिम राबविल्याने शिरवळ पोलीस ठाणे हद्दीत गहाळ झालेले एकुण ७ मोबाईल फोन किंमत १,०८,०००/- रुपयेचे स्मार्ट मोचाईल फोन हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. सदरची मोहीम वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार असल्याचे शिरवळ पोलीस निरीक्षक याशवंत नलावडे यांनी सांगीतले आहे.

तसेच शिरवळ पोलीस ठाणे गुन्ह र.नं. ३७७/२०२३ भा.द.वि कलम ३८१ प्रमाणे दाखल गुन्हा उघडकीस आणुन त्याचे तपासा दरम्यान जप्त करण्यात आलेले वगवेगळ्या कंपनीचे एकुण किंमत ३,९०,०००/- रुपयेचे मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत. सदर जप्त मोबाईल फोन परत मिळणे करीता गुन्हयातील फिर्यादी मयुर शिंदे यांनी मा. न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्याप्रमाणे मा. न्यायालयाने सदर जप्त मुद्देमाल फिर्यादी यांना परत करण्याचे आदेशीत केले आहे. तरी सदरचा मुद्देमाल आज रोजी त्यांना परत करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुद्देमाल कारकुन स.पो.फी. सुर्यवंशी, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोहया सचिन वीर, पो.कॉ. सुरज चव्हाण, अजित बोराटे, मंगेश मोझर, अक्षय बगाड़, यांनी केलेली आहे. सदरच्या उल्लेखनीय कामगीरी बाबत शिरवळ पोलीस ठाणेचे सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.वैशाली कडुकर यांनी अभिनंदन केले आहे.

No comments