काटवण खंडोबा येथील मावा कारखाना विशेष पोलीस पथकाकडून उध्वस्त सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर (दि.१७):- शहरात...
काटवण खंडोबा येथील मावा कारखाना विशेष पोलीस पथकाकडून उध्वस्त
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.१७):- शहरातील काटवन खंडोबा येथील पत्र्याच्या शेडमध्ये सुगंधीत तंबाखु पासून मावा तयार करण्याचे मशीन,तयार मावा स्वतःच्या कब्ज्यात विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवले आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तयार केलेल्या विशेष पथकास मिळाली त्यानुसार परिविक्षाधिन उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकून कारवाई केली या कारवाईत 2 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.श्याम पांडुरंग मोकाटे,कैलास बबनराव मोकाटे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे, यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विशेष पोलीस पथकाचे परिविक्षाधिन उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने केली आहे.
No comments