हिंगोणे येथे स्वच्छ दूध उत्पादनावर प्रात्यक्षिकेचे आयोजन. यावल प्रतिनीधी शब्बीर खान (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ग्रामीण कृषि जागरूकता अणि...
हिंगोणे येथे स्वच्छ दूध उत्पादनावर प्रात्यक्षिकेचे आयोजन.
यावल प्रतिनीधी शब्बीर खान
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
ग्रामीण कृषि जागरूकता अणि कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शासकीय कृषि महाविद्यालय, मुक्ताईनगर येथील शिरीष कांबळे, प्रज्वल पाटील, तेजस वेताळ, ओम स्वामी, प्रथमेश शेळके व आदित्य पवार ह्या कृषिदूतांनी,
हिंगोने या गावात पशु उत्पादन हस्तक्षेप या विषयाचे प्रात्यक्षिकेचे आयोजण शेतकरीराजाच्या गोठ्यात घेण्यात आले होते, या मध्ये स्वच्छ दूध उत्पादन कसं घ्यावं, पशु पिळतांना कुठली काळजी घ्यावी, त्याचा निश्चित वेळ किती असावा व पशु पिळण्याची जगा कशी असावी, अशा बऱ्याच बिबिंवर लक्ष केंद्रित करून प्रात्यक्षिकेच्या माध्यमातून हे शेतकऱ्यांना दाखवून देण्यात आले. या कार्यक्रमासाठी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संदीप पाटील, ग्रामीण कृषि । जागरूकता व कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाचे चेअरमन डॉ. दत्तात्रय पाचारणे, कार्यक्रम समन्वयक डॉ. बाळासाहेब रोमाडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. सागर बंड, व विविध विषयातील विषय विशेषज्ञ यांचे मार्गदर्शन लाभले होते.

No comments