वसंतराव नाईक जयंतीनिमित्त कृषीकन्यांचा विरावली गावात प्रतिसाद महाराष्ट्र कृषि दिन व वृक्षारोपण उपक्रम गावात उत्साहात साजरा केला भरत कोळी...
वसंतराव नाईक जयंतीनिमित्त कृषीकन्यांचा विरावली गावात प्रतिसाद
महाराष्ट्र कृषि दिन व वृक्षारोपण उपक्रम गावात उत्साहात साजरा केला
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दि. 1 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र कृषि दिनाचे औचित्य साधून विरावली येथे विविध उपक्रमांद्वारे हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथील अंतिम वर्षातील कृषीकन्यांनी खुप उत्साहने सजरा केला कार्यक्रमाची सुरुवात ग्रामसेविका सौ. छाया पाटिल, उप सरपंच ईश्वर पाटिल, जि.प शाळेतील मुख्याध्यापिका सौ. योगेश्वरी धनगर व इतर शिक्षक त्यानंतर गणेश वंदना पारंपरिक वेशभूषेत स्वागत गीताने झाली. पुष्प गुलाब देउन कृषीकन्यांनी मान्यवरांचे सत्कार केले. विद्यार्थ्यांद्वारे एक मुक नाटक सादर करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला आणि उत्तम उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना गौरवण्यात आले.
या उपक्रमास कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, प्रा. बी. एम. गोणशेटवाड आणि प्रा. एम. पी. भोळे यांच्या मार्गर्शनाखाली कृषिकन्या धनश्र्वेता अहिरे, प्रज्ञा गजरे, ऐश्वर्या सोनवणे, सृष्टी डोंगरे, प्रतिक्षा गावीत, विशाखा सोनवणे यांनी विरावली ता. यावल येथे कार्यक्रम करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य, कृषिकन्या आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. या उपक्रमामुळे शेतीप्रती सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होत असून, ग्रामस्तरावर पर्यावरण व कृषि क्षेत्रात जनजागृती घडवून आणण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. गावकऱ्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र कृषि दिन हा उत्सव साजरा केला. पर्यावरण संवर्धन, शेतीविषयक जनजागृती आणि ग्रामीण विकासाची दिशा या उपक्रमातून स्पष्ट दिसून आले. शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले, रॅली, मुक नाट्य इ. कार्यक्रम राबविण्यात आले.

No comments