adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मलकापूर छत्रपती शिवराय प्रतिष्ठानची राकाँपा संस्थापक मा.शरदचंद्र पवार यांची घेतली भेट या अ‍ॅड.मोरे.. पवार साहेबांचा आवाज ऐकताच सर्वजण आवाक

मलकापूर छत्रपती शिवराय प्रतिष्ठानची राकाँपा संस्थापक मा.शरदचंद्र पवार यांची घेतली भेट या अ‍ॅड.मोरे.. पवार साहेबांचा आवाज ऐकताच सर्वजण आवाक अ...

मलकापूर छत्रपती शिवराय प्रतिष्ठानची राकाँपा संस्थापक मा.शरदचंद्र पवार यांची घेतली भेट

या अ‍ॅड.मोरे.. पवार साहेबांचा आवाज ऐकताच सर्वजण आवाक



अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर -:- छत्रपती शिवराय प्रतिष्ठाण मलकापूर यांची राष्ट्रीय महामार्ग क्र.६ मध्ये जमीन गेली असून या १५०० चौ.मी. जमिनीचा वाढीव मोबदला २०२४ पासून केंद्र सरकारकडून मिळाला नसल्याने या बहुजन समाजाच्या प्रतिष्ठानची अनेक कामे अडगडीत  पडली आहेत. यामुळे आपण केंद्र सरकारकडून तो वाढीव मोबदला मिळविण्यासाठी मदत करावी, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरदचंद्र पवार यांच्याकडे छत्रपती शिवराय प्रतिष्ठानचे संचालक व शिष्टमंडळाने ३० जून रोजी मुंबई येथे भेट घेवून दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते श्रीराम पाटील, छत्रपती शिवराय प्रतिष्ठानचे सचिव अ‍ॅड.साहेबराव मोरे, संचालक प्रकाश पाटील, ज्ञानदेवराव हिवाळे, इंजि.सचिन तायडे, उद्योजक इंजि.सौ. कोमलताई सचिन तायडे आदींनी ३० जून रोजी शरदचंद्र पवार यांची वायबी सेंटर मुंबई येथे भेट घेत छत्रपती शिवराय प्रतिष्ठानच्या मंगल कार्यालयाच्या कार्याची माहिती दिली. यावेळी गेल्या १० वर्षापासून बहुजन समाजासाठी छत्रपती शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने कार्य सुरू असून अतिशय कमी व माफक दरात गोरगरीब नागरिकांच्या मुला-मुलींचे लग्न, विविध सामाजिक कार्य, उपक्रमे या मंगल कार्यालयात साजरे करण्यात येतात. छत्रपती शिवराय प्रतिष्ठाची १५०० चौ.मी. जमीन राष्ट्रीय महामार्ग क्र.६ मध्ये गेली असून सुरूवातीची माफक नुकसान भरपाई मिळाल्यानंतर आर्बिट्रेशन बुलढाणा यांचेकडे अपिल दाखल करून त्याचा निकाल २४ एप्रिल २०२४ रोजी होवूनही ती नुकसान भरपाईची रक्कम वाढवून देण्यात आली. मात्र या निकालाला तब्बल १ वर्षाच्यावर कालावधी उलटल्यानंतरही केंद्र सरकारकडून या नुकसान भरपाईची वाढीव रक्कम अद्यापही देण्यात आली नाही. सद्यस्थितीत छत्रपती शिवराय प्रतिष्ठानच्या या इमारतीची अनेक कामे बाकी आहेत. तिसर्‍या मजल्यावरील १६ खोल्यांचे काम अर्धवट पडले आहे. पैशांअभावी कामे रखडली असल्याने  केंद्र सरकारकडून मिळणारा वाढीव नुकसान भरपाई तात्काळ मिळणे गरजेचे असल्याने आपण याबाबत स्वत: लक्ष घालून ही रक्कम मिळवून द्यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने शरदचंद्र पवार यांचेकडे याबाबत सविस्तर माहिती देत केली आहे.

यावेळी शरदचंद्र पवार यांनी उद्योजक सौ.कोमलताई सचिन तायडे यांच्या एस.के.स्क्वेअर एंटरप्राईजेसच्या कामाचीही माहिती घेत तरूणांनी हातांना रोजगार मिळेल असे उद्योग करणे गरजेचे असल्याचे सांगत सौ.कोमलताई तायडे यांच्या या उद्योगाचे कौतुक करीत आपण नेहमीच अशा तरूणांच्या पाठीशी उभे असल्याचे त्यांनी सांगितले.

तर यावेळी शिष्ट मंडळाने संसदरत्न खा.सुप्रियाताई सुळे यांचीही भेट घेतली. यावेळी शरदचंद्र पवार व खा.सुप्रियाताई सुळे यांनी छत्रपती शिवराय प्रतिष्ठानच्या उद्घाटन समारंभास नक्कीच येवू असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. 

या अ‍ॅड.मोरे.. पवार साहेबांचा आवाज ऐकताच सर्वजण आवाक 

शरदचंद्र पवार साहेब आपल्या जुन्या कार्यकर्ते व नेत्यांना अजूनही नावाने ओळखतात. याबाबत आपण अनेकदा ऐकले आहे. याची प्रचिती या शिष्टमंडळाला आली. अ‍ॅड.साहेबराव मोरे यांनी तब्बल १५ ते १७ वर्षांनी शरदचंद्र पवार यांची भेट घेतली. यावेळी सभागृहात शिष्टमंडळाने प्रवेश करताच पवार साहेबांनी ‘या अ‍ॅड.मोरे अशी हाक मारताच सर्व जण आवाक झाले.’ यावेळी शरदचंद्र पवार यांनी अ‍ॅड.साहेबराव मोरे यांच्या सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच अ‍ॅड.साहेबराव मोरे यांनी इंजि.सौ.कोमलताई सचिन तायडे यांचा परिचय करून देत त्यांच्या उद्योगाची माहिती पवार साहेबांना दिली असता पवार साहेब यांनी त्या करीत असलेल्या उद्योगाची माहिती जाणून घेत एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांना रोजगार मिळवून दिल्याबद्दल सौ.कोमलताई तायडे यांचे कौतुक करीत अशा धाडसी तरूणांच्या पाठीशी आपण कायम असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments