साकळी ग्रामपंचायतीत मोफत नेत्रतपासणी शिबिरास उत्तम प्रतिसाद भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल :- साकळी येथील ...
साकळी ग्रामपंचायतीत मोफत नेत्रतपासणी शिबिरास उत्तम प्रतिसाद
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल :- साकळी येथील ग्रामपंचायत साकळी व समता फाऊंडेशन जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने दि.६ जुलै २०२५ रोजी मोफत मोतीबिंदु तपासणी शिबीर सरपंच दिपक पाटील यांच्या संकल्पनेतुन आयोजित करण्यात आले होते.या शिबीराच्या माध्यमातुन समता दिव्य ज्योति अभियानास ग्रामपंचायत मध्ये सरपंच दिपक पाटील यांचेहस्ते शुभारंभ करण्यात आला. या शिबिरात ७६ नागरिकांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये ३१ जणांना मोतीबिंदु असल्याचे निष्पन्न झाले त्यांची शस्त्रक्रिया या आठवड्यात करण्यात येणार आहे. आता या पुढे दर महिन्याच्या पहिल्या रविवारी नेत्रतपासणी शिबीर ग्रामपंचायत मध्ये घेतले जाणार आहे.या शिबिराच्या माध्यमातून साकळी परिसर मोतीबिंदु मुक्त व्हावा हा मुख्य उद्देश आहे. यासाठी साकळी ग्रामपंचायत सर्व प्रकारची मदत करणार आहे. या अभियानाला याप्रसंगी ग्रा.पं. सदस्य परमानंद बडगुजर,मुकेश बोरसे,विनोद खेवलकर,नरेंद्र मराठे,माजी ग्रा.पं.सदस्य साहेबराव बडगुजर,शरद बिराडे सामाजिक कार्यकर्ते योगेश कुंभार, शे सलीम शे मजीद, उमेश बडगुजर तसेच समता फाऊंडेशनचे राठोड साहेब आणि नागरिक बंधु भगिनी उपस्थित होते.
प्रतिक्रिया- आषाढी एकादशीच्या दिवशी योगा-योगाने नेत्रतपासणी शिबिर आयोजनाचे भाग्य मला लाभले.त्यामुळे या नेत्र तपासणी शिबिराच्या माध्यमातून ज्या गोर-गरीब जनतेची सेवा करण्याची संधी मला मिळाली यातच मला या आज ठिकाणी साक्षात पांडूरंग विठ्ठल भेटल्याची प्रचिती आली असून सेवेतून भक्तीभाव निर्माण झालेला आहे. असे लोकनियुक्त सरपंच दिपक पाटील यांनी सांगितले
No comments