Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महाराष्ट्र माथाडी व जनरल कामगार संघ संलग्न भारतीय मजदुर संघ जिल्हाध्यक्षपदी श्री.विनोद सुर्वे यांची निवड

  महाराष्ट्र माथाडी व जनरल कामगार संघ संलग्न भारतीय मजदुर संघ जिल्हाध्यक्षपदी श्री.विनोद सुर्वे यांची निवड            🔹रत्नागिरी जिल्ह्यात ...

 महाराष्ट्र माथाडी व जनरल कामगार संघ संलग्न भारतीय मजदुर संघ जिल्हाध्यक्षपदी श्री.विनोद सुर्वे यांची निवड

           🔹रत्नागिरी जिल्ह्यात सर्व कामगार विभागातून विनोद सुर्वे यांना अभिनंदनाचा वर्षाव 


  चिपळूण (वार्ताहर) :-   

(संपादक हेमकांत गायकवाड)                                            महाराष्ट्र  माथाडी व जनरल कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघ या संघटनेच्या वतीने विभागीय स्तरावर महाराष्ट्र  माथाडी व जनरल कामगार संघाची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती.या सर्वसाधारण सभेमध्ये अनेक विषयावर साधक –बाधक चर्चा झाल्यावर सर्वानुमते जिल्ह्यासाठी वेळ देणारा तसेच संघटनेची ध्येय व धोरणे व कामगारांना  न्याय मिळवून देणारा कार्यकर्ता व जिल्हाध्यक्ष असावा असे सर्वानुमते ठरले व चिपळूण अलोरे येथील श्री.विनोद सुर्वे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.                                             नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष श्री.विनोद सुर्वे हे शैक्षणिक ,सामाजिक ,कला,क्रीडा  क्षेत्रात अनेक वर्ष दसपटी भागात काम करत आपलं नाव समाजासमोर तयार झाले. डॅश फ्रेंड्स ग्रुप संस्थेचे अध्यक्ष म्हणून गेले वीस वर्ष काम करत असताना राजकीय क्षेत्रात गेले अनेक वर्ष निस्वार्थीपणे सामाजिक बांधिलकी जपत गोर-गरिबांना अन्न वस्त्र निवारा देण्याचे उत्कृष्ट सामाजिक कार्य केलेले आहे. हेच माझे ध्येय असे उद्दिष्ट ठेवून  कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता गेले 11 वर्ष भारतीय जनता पार्टी काम करत असून  महाराष्ट्र जनरल श्रमिक कामगार संघ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यामध्ये ६००० कामगार वर्ग या संघटनेमध्ये जोडला गेला असून आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर संघटनेचे काम चालू आहे. आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली  राजकारण विरहित एक समाजाचा घटक म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघ चिपळूण तालुका अध्यक्ष म्हणून गेली चार वर्षे काम करत आहेत. आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून अनेक बेरोजगार मुलांना शैक्षणिक  कर्जाचे वाटप करून दिले. कामगारांच्या अनेक प्रश्नावर ग्रामीण शहरी न्याय देण्याचे कार्य व काम करीत आहेत. भारतीय जनता पार्टी सलग्न असणारी एक कामगार क्षेत्रातील मोठी संघटना यांचं संघटनेचे मुख्य सल्लागार श्री रवींद्र चव्हाण साहेब भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष तसेच कामगार संघाचे  अध्यक्ष संजय उपाध्याय,प्रमुख उपस्थिती ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष श्री.संजय वाघूले ,सरचिटणीस अरुण दळवी, चिटणीस सुप्रीम सुर्वे, अँड श्री. के.पी. गुरव कायदेविषयक सल्लागार यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व तळा-गाळातीलकामगारांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी मी जिल्ह्यात कायम कटीबद्ध राहीन. असे मनोगत व्यक्त करीत नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष श्री.विनोद सुर्वे यांनी सर्वाना संबोधित केले. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments