adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सुगंधी तंबाखू व मावा तयार करणारा कारखाना विशेष पोलीस पथकाने केला उध्वस्त, DYSP संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कारवाई

  सुगंधी तंबाखू व मावा तयार करणारा कारखाना विशेष पोलीस पथकाने केला उध्वस्त, DYSP संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कारवाई  सचिन मोकळ...

 सुगंधी तंबाखू व मावा तयार करणारा कारखाना विशेष पोलीस पथकाने केला उध्वस्त, DYSP संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कारवाई 



सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.१२):- जिल्ह्यातील पाथर्डी शहरात सुगंधी तंबाखू,मावा तयार करणारा कारखाना विशेष पोलीस पथकाने उध्दवस्त करुन १लाख ३३,२०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून ०४ आरोपीं विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार  परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री.संतोष आ.खाडे हे दि.११ जुलै २०२५ रोजी पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विशेष पोलीस पथकासह पेट्रोलींग करुन अवैध धंद्यांची माहिती घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,इसम नामे अभिजीत मिनीनाथ लांडे (रा. आनंदनगर ता.पाथर्डी) हा त्याचे अक्षय पान टपरी,मोहटादेवीकडे जाणारे रोडलगत या मध्ये महाराष्ट्र राज्यात तंबाखूजन्य पदार्थाचे विक्री व तयार करण्यास प्रतिबंध असताना सुगंधीत तंबाखू मिसळून मावा तयार करुन विक्री करताना मिळून येईल अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तात्काळ पाथर्डी पोलीस स्टेशनचा स्टाफ व पंचांना बोलावून घेऊन वरील नमूद ठिकाणी छापा टाकण्यासाठी हकिगत समजावून सांगून त्यांनी संमती दिल्यानंतर कारवाई करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह शासकीय व खाजगी वाहनाने रवाना झाले.नमूद बातमीतील ठिकाणी अक्षय पान टपरी,मोहटा देवीकडे जाणारे रोडलगत ता.पाथर्डी येथे जाऊन खात्री केली असता एक इसम पान टपरी मध्ये बसून सुगंधीत तंबाखू विक्री करताना दिसून आला.पोलीस पथकाची खात्री झाल्याने छापा टाकला असता पान टपरीमध्ये चसलेल्या इसमास ताब्यात घेऊन त्यास पोलीस पथक असल्याची माहिती देऊन पंचासमक्ष त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अभिजीत मिनीनाथ लांडे वय-५२ वर्षे रा.आनंदनगर ता.पाथर्डी असे सांगितले. पंचांसमक्ष त्याच्या पान टपरीची झडती घेतली असता त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली व शरिरास अपायकारक होईल अशी ५,६००/- रुपये किंमतीचा एका प्लॉस्टिकच्या पिशवीमध्ये ०८ किलो तयार मावा मिळून आला त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सांगितले की, मी अक्षय गणेश इधाटे रा.इंदीरानगर,ता.पाथर्डी,राहूल अर्जुन सानप,सुनिल बाबासाहेब सानप दोघे रा.तनपुरवाडी फाटा ता.पाथर्डी यांच्याकडून तयार मावा व सुगंधीत तंबाखू खरेदी करतो.असे सांगितल्यानंतर पोलिसांनी तात्काळ पंचांसमक्ष अक्षय गणेश इधाटे रा.इंदीरानगर ता.पाथर्डी,याच्या घरी जाऊन खात्री केली असता त्याठिकाणी अक्षय गणेश इधाटे याचे राहते घराला लागून असलेल्या पत्र्याचे शेडमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या पुड्धांमध्ये तसेच पिशवीमध्ये ६०,८०० रुपये किंमतीची ६५ किलो सुगंधीत तंबाखू मिळून आली. सदर ठिकाणी अक्षय गणेश इथाटे रा. इंदिरानगर ता. पाथडी (फरार) त्याचा शोध घेतला आला तो मिळून आला नाही.तसेच सुनिल बाबासाहेब सानप व राहूल अर्जुन सानप हे तनपुरवाडी फाटा येथे सुगंधीत तंबाखू व तयार मावा करण्यासाठी लागणारी मशीन ठेवत असलेबाबतची माहिती मिळाल्याने तात्काळ सदर ठिकाणी पोलीस पथक व पंचांना सोचत घेऊन जाऊन खात्री केली असता दिनकर कुटे यांची विटभट्टीला लागून असलेल्या पत्र्याचे शेडमध्ये एक इसम मशीनवर मावा करताना मिळून आला.त्यास ताब्यात घेऊन त्यास पोलीस पथक असल्याची माहिती देऊन पंचासमक्ष त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सुनिल बाबासाहेब सानप वय-३६ वर्षे रा. शिरसाटवाडी असे सांगितले. पंचासमक्ष सदर शेडमध्ये पाहणी केली असता शेडमध्ये एका प्लॉस्टिक पिशवीमध्ये ७,००० रुपये किंमतीचा १० किलो तयार मावा, ४,८०० रुपये किंमतीची ०६ किलो सुगंधीत तंबाखू तसेच ५५,००० रुपये किंमतीची मावा तयार करण्याची मशीन असा एकूण ६६,८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे. तसेच मिळून आलेल्या इसमाकडे विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सांगितले की, सदरचा व्यवसाय माझ्यात आणि राहूल अर्जुन सानप

रा. शिरसाटवाडी ता. पाथडी (फरार) यांच्यामध्ये आहे. राहुल अर्जुन सानप याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही.

सदरची कामगिरी श्री.सोमनाथ घार्गे  पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर,श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर विभाग अहिल्यानगर, श्री.सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकाचे प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे,पोसई राजेंद्र वाघ,पोहेकॉ.शंकर चौधरी, पोहेकॉ.अजय साठे,पोहेकॉ. दिगंबर कारखेले,मल्लिकार्जुन बनकर,अरविंद भिंगारदिवे,उमेश खेडकर,सुनिल पवार,सुनिल दिघे,अमोल कांवळे,संभाजी बोराडे,विजय ढाकणे,दिपक जाधव,जालिंदर दहिफळे केली आहे.

No comments